Gold Silver Rate : ऑगस्ट महिन्यात सोन्या चांदीच्या दरात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली होती. कधी सोन्याचे दर चढे राहिले होते, तर कधी सोन्याच दर किंचित खाली आले होते. आज ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर काहीसे खाली आले आहेत. त्यामुळे थोडा का होईना सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आजचे सोन्या चांदीचे दर काय आहेत? हे जाणून घेऊयात. (gold-silver prices today 31 august 2024 in maharashtra mumbai pune know the full details)
ADVERTISEMENT
आज, शनिवारी, 31 ऑगस्ट 2024 रोजी सोने किंचित स्वस्त झाले आहे. ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 100 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 72,200 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 67,100 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 54,800 रुपयांवर पोहोचला आहे. तर आज चांदीचा दर 87,900 रुपये आहे. आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच तुम्ही जर लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सोने खरेदीसाठी ही सर्वोत्तम वेळ असू शकते.
देशातील मोठ्या शहरांमधील सोन्याचे दर
दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 73,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 67,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
नोएडामध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 73,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 67,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: 3000 की 4500 रुपये मिळणार, नेमके किती पैसे तुमच्या खात्यात येणार?
जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत 67,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत 67,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत 67,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत 67,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
बंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत 67,060 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हे ही वाचा : सप्टेंबरपासून 'हे' नियम बदलणार, सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम?
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT