September Bank Holidays: मज्जाच मज्जा! सप्टेंबर महिन्यात सुट्ट्यांचा महापूर; ही यादी पाहा अन् प्लॅन...

रोहिणी ठोंबरे

• 07:27 PM • 28 Aug 2024

Bank Holiday : आता ऑगस्ट महिना संपत आला असून सप्टेंबर महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांमधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

सप्टेंबर महिन्यात सुट्ट्यांचा महापूर!

point

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांमधील सुट्ट्यांची यादी जाहीर

point

घराबाहेर पडण्याआधी बँकांच्या सुट्ट्यांची 'ही' संपूर्ण यादी पाहा...

Bank Holiday in September : महाराष्ट्रातील प्रत्येकजण सप्टेंबर महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण या महिन्यात सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. आता ऑगस्ट महिना संपत आला असून सप्टेंबर महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांमधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. (Holiday List of September 2024 Bank Holidays and Festivals like ganesh chaturthi)

हे वाचलं का?

प्रत्येक महिन्याप्रमाणे, सप्टेंबर 2024 मध्येही अनेक मोठे बदल (नियम बदल) पाहायला मिळतील. यासोबतच बँकांमध्येही बंपर सुट्ट्या असतील. जर तुमचे पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक हॉलिडे लिस्टमध्ये कोणत्या दिवशी सुट्टी घोषित केली आहे हे जाणून घेऊया.

हेही वाचा : Sindhudurga: राजकोटवर राडा, राणेंच्या बालेकिल्ल्यात भर पावसात ठाकरेंचं तडाखेबदं भाषण!

सप्टेंबर महिन्यात सुट्ट्यांचा महापूर!

सप्टेंबर महिन्याची सुरुवात सुट्ट्यांसह होणार आहे. रविवार 1 सप्टेंबर 2024 रोजी साप्ताहिक सुट्टी असल्याने देशभरातील बँक शाखा बंद राहतील. याशिवाय या महिन्यात अनेक राज्यांमध्ये मोठे सण आहेत, त्यामुळे संबंधित राज्यांमध्ये बँक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने आपला गणेश चतुर्थीचा सण आहे. 

RBI च्या हॉलिडे कॅलेंडर 2024 नुसार, भारतातील विविध क्षेत्रांमधील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका सप्टेंबरमध्ये एकूण 15 दिवस बंद राहतील. सप्टेंबरमधील 15 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्या तसेच रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश होतो.

हेही वाचा : Sindhudurga: 'अरे ठेचून एक-एकाला रात्रभर मारुन टाकेन...', पोलिसांसमोर नारायण राणेंची थेट धमकीची भाषा

सप्टेंबर महिना हा सणासुदीचा महिना असल्याने या महिन्यात सुट्यांचा महापूरच असणार आहे. या महिन्यात गणरायांचे आगमनही होणार आहे त्यामुळे अधिकाधिक सुट्या बँकांला असणार आहेत.

    follow whatsapp