आयआयटी कानपूरचे वरिष्ठ प्राध्यापक आणि स्टुडेंट वेलफेअरचे डीन प्रा. समीर खांडेकर (55) यांचे हार्ट अटॅकने निधन झाले आहे. प्रा. समीर खांडेकर यांना ज्यावेळेस हार्ट अटॅक आला त्यावेळेस ते आरोग्याच्या विषयावर मार्गदर्शन करत होते. आणि त्यांच्या तोडून ‘आरोग्याची काळजी घ्या’ असे शेवटचे शब्द उमटले होते. यानंतर अचानक ते खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. या घटनेने आयआयटी कानपूर युनिवर्सिटीत हळहळ व्यक्त होत आहे. (iit kanpur professor sameer khandekar dies collapse while speaking on statge shocking story kanpur)
ADVERTISEMENT
प्रा. समीर खांडेकर हे शुक्रवारी आयआयटी सभागृहात माजी विद्यार्थी मेळाव्याला संबोधित करत होते. यावेळी खांडेकर हे आरोग्याच्या विषयावर मार्गदर्शन करत होते. हे मार्गदर्शन करत असताना ‘आरोग्याची काळजी घ्या’ असा त्यांनी उपस्थितांना सल्ला दिला, इतक्यात अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते खाली बसले. उपस्थितांना वाटले ते भावूक झाले आहेत. मात्र अचानक त्यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर त्यांना तातडीने कार्डियोलॉजी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.
हे ही वाचा : WFI Suspended : मोदी सरकारचा तडकाफडकी निर्णय! कुस्ती महासंघ कार्यकारिणी बरखास्त
रूग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यांचा वैद्यकीय इतिहास आणि मृतदेहाची तपासणी केल्यानंतरच त्यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्ट किंवा कार्डिअॅक ब्लॉकमुळे झालाय, हे स्पष्ट होणार आहे.तसेच पोस्टमार्टम रिपोर्टमधून देखील या गोष्टी स्पष्ट होणार आहेत, असे कार्डिओलॉजी हॉस्पिटलचे डॉ. नीरज कुमार यांनी ‘आज तकला’ सांगितले.
दरम्यान प्राचार्य खांडेकर यांचा मुलगा केंब्रिज विद्यापीठात शिकतो. त्यामुळे त्याचा मुलगा परतल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार केले जाणार आहेत. प्रा. समीर खांडेकर हे 55 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात त्यांच्या आई-वडिलांशिवाय पत्नी आणि एक मुलगा आहे. समीर खांडेकर यांचा जन्म जबलपूरमध्ये झाला. आयआयटी कानपूरमधून बीटेक केले, त्यानंतर पीएचडी करण्यासाठी ते जर्मनीला गेले होते.
खांडेकर यांच्या नावावर 8 पेटंट
प्रा. समीर खांडेकर हे 2004 मध्ये IT कानपूरमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले, त्यानंतर ते असोसिएट प्रोफेसर, नंतर मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख आणि नंतर स्टुडेंट वेलफेअरचे डीन झाले. त्यांच्या नावावर 8 पेटंटही आहेत.
हे ही वाचा : Eknath Shinde : “ते दरोडेखोर आम्हाला…”, CM शिंदे उद्धव ठाकरेंवर बरसले
दरम्यान प्रा. खांडेकर कोलेस्टेरॉलच्या आजाराने ग्रस्त होते, त्यानंतर त्यांना सतत औषधोपचार सुरू होते. सध्या प्राचार्याने मृत्यूने संपूर्ण आयआयटी कानपूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT