Maharashtra Mumbai Rain Updates : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरू आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली असून, मंगळवारी (९ जुलै) हवामान कसे असेल, कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर कसा असेल, याबद्दल हवामान विभागाने काय अंदाज वर्तवला आहे, तेच जाणून घ्या... (The IMD has predicted that heavy rain will fall in the districts of Pune, Satara, Ratnagiri and Sindhudurg)
ADVERTISEMENT
भारतीय हवामान विभागाने पश्चिम घाट क्षेत्रात असलेल्या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासांत राज्यातील चार जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
9 July Weather Updates : आज महाराष्ट्रात कुठे असेल पाऊस?
8 जुलै रोजी मुंबई, ठाणे भागात प्रचंड पाऊस झाला. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात जोरात पाऊस होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
हेही वाचा >> पश्चिम, मध्य आणि हार्बर लाईनवर लोकल सेवा सुरु आहे का? अपडेट काय?
मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमी असेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
हेही वाचा >> शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाचा निर्णय काय?
Maharashtra Weather : चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाने राज्यातील चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यात पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत गडगडाटासह अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे.
ADVERTISEMENT