Iran President Helicopter Crash : हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष ठार

मुंबई तक

• 10:26 AM • 20 May 2024

Iran President Ebrahim Raisi Dies In Chopper Crash : इराणमधील वेळेनुसार हा अपघात रविवारी (१९ मे) दुपारी एकच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता) झाला.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू.

Ebrahim Raisi helicopter Crashed : इब्राहिम रईसी यांचे दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर.

follow google news

बातम्या हायलाइट

point

इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरचा अपघात

point

इब्राहिम रईसी यांचे अपघातात मृत्यू

point

परराष्ट्र मंत्र्यांचाही हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूम

Iran President Helicopter Crash : एका भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सने इराणच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, बचाव पथकांनी अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष शोधून काढले आहेत आणि बर्फाच्छादित डोंगराळ भागात घडलेल्या या अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री जिवंत असण्याच्या आशा मावळल्या आहेत. (President Ebrahim Raisi Dies In Chopper Crash)

हे वाचलं का?

इराणच्या प्रेस टीव्हीने एक्स पोस्टमध्ये लिहिले की, 'रेस्क्यु टीमने राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची ओळख पटवली आहे. कुणीही व्यक्ती जिवंत असल्याचे आढळून आलं नाही.'

इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरला काय झालं?

राष्ट्रपतींच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टरचा समावेश होता. त्यापैकी दोन सुखरूप परतले, परंतु इब्राहिम रईसी यांच्यासह इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहिन, पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मालेक रहमती आणि धार्मिक नेते मोहम्मद अली अले-हाशेम हे प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर परतले नाही.

"अध्यक्ष रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात पूर्णपणे जळून खाक झाले... दुर्दैवाने, हेलिकॉप्टरमधील सर्व लोकांचा मृत्यू झाल्याची शंका आहे," असे अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले.

सोमवारी पहाटे पूर्व अझरबैजान प्रांतातील डोंगराळ भागात कोसळलेल्या हेलिकॉप्टरच्या अवशेषापर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकांनी रात्रभर हिमवादळातून मार्ग काढला. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर सुमारे १७ तासांनी बचाव पथके अपघातस्थळी पोहोचू शकली.

हेही वाचा >> फडणवीसांचा उपमुख्यमंत्री होण्यास नकार, मग मोदींनी केला फोन! Inside Story

इराणच्या वेळेनुसार हा अपघात रविवारी (19 मे) दुपारी एकच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता) झाला. अपघात झाल्यापासून शोधमोहीम सुरू असून, त्यात ४० पथके युद्धपातळीवर काम करत आहेत.

इराणच्या सशस्त्र दलाचे चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद बागेरी यांनी हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी लष्कर, इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड्स कॉर्प्स (IRGC) आणि कायदा अंमलबजावणी दलाची सर्व उपकरणे वापरण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा >> पूनम महाजनांचं तिकीट कापलं, कारण...फडणवीसांनीच सांगितलं काय घडलं?

तुर्कस्तानने आपले नाईट व्हिजन हेलिकॉप्टर बचाव पथक आणि 3 वाहनांसह इराणला पाठवले होते.

रईसी अझरबैजानला का गेले होते?

इराण आणि अझरबैजान आपले संबंध सुधारण्यासाठी अझरबैजानमध्ये सामूहिक धरण बांधत आहेत. या मालिकेतील हे तिसरे धरण होते, ज्याच्या उद्घाटनासाठी इब्राहिम रईसी अझरबैजानला गेले होते. उद्घाटन कार्यक्रमासाठी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलियेव यांनी त्यांना आमंत्रित केले होते.

अपघाताचे कारण काय?

हेलिकॉप्टर बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर या अपघाताचे खरे कारण समोर येऊ शकेल. मात्र, इराणच्या मीडिया रिपोर्टनुसार, सुरुवातीचे कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे. तेहरान टाइम्सच्या वृत्तानुसार, दाट धुक्यामुळे हा अपघात झाला. तेहरानच्या वायव्येस सुमारे 600 किलोमीटर (375 मैल) अंतरावर अझरबैजान प्रांताच्या सीमेवर असलेल्या जोल्फाजवळ हा अपघात झाला. सुंगून नावाच्या तांब्याच्या खाणीजवळ हेलिकॉप्टर कोसळले. हे इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतात जोल्फा आणि वाराझकान दरम्यान आहे.

    follow whatsapp