Majhi Ladki Bahin Yojna: 'अर्ज केलाय पण, पैसेच आले नाहीत', टेन्शन नको! समजून घ्या कारण...

रोहिणी ठोंबरे

18 Aug 2024 (अपडेटेड: 18 Aug 2024, 03:54 PM)

Majhi Ladki Bahin Yojna: 'माझी लाडकी बहीण योजने' अंतर्गत ज्या महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काय करावं, यासंदर्भात शासनाकडून गाईडलाईन जारी केल्या आहेत.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलांनी 'या' गोष्टींची तपासणी करावी

point

'या' योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही?

Majhi Ladki Bahin Yojna Update : महाराष्ट्र शासनाच्या 'माझी लाडकी बहीण योजने' अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील एक कोटींहून अधिक महिलांना या योजनेंतर्गत दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या अर्जासाठी जुलै महिन्यापासून सुरूवात झाली. पण रक्षाबंधनाचा सण येऊ घातल्याने लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे हफ्ते म्हणजेच एकूण 3000 रूपये जमा व्हायला सुरूवात झाली आहे. अजूनही ही प्रक्रिया सुरु आहे. परंतु, ज्या महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काय करावं? यासंदर्भात शासनाकडून गाईडलाईन जारी केल्या आहेत. (Majhi Ladki Bahin Yojna your Application approved but money not received know the reason about it)  

हे वाचलं का?

31 ऑगस्ट अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना खास सरकारकडून राबवण्यात येत आहे. पण, अनेक महिलांच्या खात्यात अजूनही 3000 रूपये जमा झालेले नाहीत अशावेळी त्यांनी खालीलप्रमाणे दिलेल्या या गाईडलाईन फॉलो केल्या पाहिजेत.

    follow whatsapp