Manoj jarange patil On Ajay baraskar maharaj allegation : मराठा आंदोलनात फुट पाडण्यासाठी सरकारकडून ट्रॅप रचला जात असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केला आहे. मराठा आंदोलनात सरकारची 19-20 लोक आहेत. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचा देखील प्रवक्ता आहे, असा खुलासा करत, सरकारने हा ट्रॅप बंद करावा नाहीतर आणखीण जड जाईल, असा इशाराच जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला आहे. (manoj jarange patil warn eknath shinde government maratha reservation ajay baraskar maharaj allegation)
ADVERTISEMENT
मनोज जरांगे पाटलांची आंतरवाली सराटीतील बैठक पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जगद्गुरू तुकाराम महाराजांबाबत माझ्याकडून जे शब्द गेले आहेत. त्यासाठी मी तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन माफी मांगतो, असे जरांगेंनी सांगितले.
हे ही वाचा : शिंदे सरकारला अडचणीत आणणार, जरांगेंचा पुढचा प्लॅन काय?
हा सरकारचा ट्रॅप आहे. यांना ट्रॅप रचून मराठा आंदोलनाला बदनाम करायचं आहे. यामध्ये शिंदेंचा प्रवक्ता देखील आहे, अजय बारसकर यांच्यासोबत आणखी 19 ते 20 माणसे आहेत. जे मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, यामागे सरकारचेच षडयंत्र आहे, असा आरोप जरांगेंनी यावेळी केला.
ज्याला फेसबूक विचारत नाही, याचा अर्थ याच्यामागे सरकारचा ट्रॅप आहे.पण मराठा संपवायला निघू नको, लेकरांपर्यंत जाऊ नको, तुला सुद्धा लेकरे आहेत, हे लक्षात ठेव, असे जरांगेंनी अजय बारसकर महाराज यांना ठणकावून सांगितले. तसेच जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आडून सरकारचा ट्रॅप चालवू नका, लक्षात ठेवा, मी तुकाराम महाराजांसमोर पुर्ता झुकलोय, सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणी नंतर लोटांगण घालेन, काही लहाणपण नाही आहे आम्हाला, कारण आम्ही शिष्य लोक आहेत वारकरी संप्रदायाचे, असे देखील जरांगेंनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा : आजोबांना साथ, अजित पवारांविरोधात सख्खा पुतण्या मैदानात?
मराठा आंदोलनात सरकारकडून 19-20 माणसे गोवली गेली आहेत. मला माहिती होतं हे काय काय करणार होते. सगळे दबले होते. काय काय रॅलीत येणार होते. ते माझ्याविरूद्ध पत्रकार परिषद घेणार होते. हा पहिला ट्रॅप होता.तसेच सरकारने ट्रॅप बंद करा नाहीतर आणखीण जड जाईल तुम्हाला, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.
आंदोलनाची दिशा ठरली
येत्या 1 मार्च रोजी वृद्ध मराठा समाज हा उपोषणाला बसणार आहे, या उपोषणादरम्यान त्यांच्या जीवाला काही धोका झाल्यास ती जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल, असा ठराव ही आजच्या बैठकीत झाल्याचे जरांगेंनी सांगितले.
तसेच 1 मार्च रोजी राज्यातल्या आजी माजी आमदार आणि खासदार यांच्यासह सर्व मंत्र्यांची बैठक अंतरवालीत बोलवण्यात आली आहे. या नेत्यांना मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका मांडण्यासाठी बोलावले आहे. 3 मार्च रोजी जिल्हास्तरावर एकाच ठिकाणी रस्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आणि 4 मार्च रोजी अंतरवालीत बैठक बोलवली आहे.
ADVERTISEMENT