CBFC: सिनेचित्रसृष्टीसाठी मुंबईचा जागतिक पातळीवर गौरव केला गेला आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मुंबई चर्चेत येत असते. आता पुन्हा एकदा मार्क अँटनी (Mark Antony) चित्रपटाचा अभिनेता विशालने एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे चर्चेला उधान आले आहे. अभिनेता विशालने (Actor Vishal) म्हटले आहे की, सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सीबीएफसीला (Central Board of Film Certification) साडे सहा लाख रुपयांची लाच (bribe) द्यावी लागली असल्याचा त्याने दावा केला आहे.याव विशालने म्हटले आहे की, त्या संदर्भात माझ्याकडे पुरावेही आहेत. याबाबत त्याने एक व्हिडीओही सगळ्यांसमोर आणला आहे. त्याच्या या व्हिडीओमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
ट्विटरद्वारे व्हिडीओ शेअर
अभिनेता विशालचा मार्क अँटनी चित्रपट 15 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाला प्रेषकांनी प्रतिसादही चांगला दिला आहे. तोच चित्रपट हिंदीतून येत असतानाच विशालने ट्विटरद्वारे व्हिडीओ शेअर केला आहे. एक दीर्घ पोस्ट लिहून त्यामध्ये त्याने आपली फसवणूक झाल्याचे सांगितले आहे.
हे ही वाचा >> Mulund : ‘…तर गालावर वळ उठतील’, राज ठाकरे कडाडले; शिंदे सरकारलाही सुनावलं
धक्कादायक प्रकार
विशालने सांगितले आहे की, मुंबईतील सीबीएफसी कार्यालयात आमच्यासोबत जो प्रकार घडला आहे तो धक्कादायक आहे. कारण आम्ही प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरला होता. मात्र काही अडचणींमुळे शेवटी आम्हाला इथेच यावे लागले. सीबीएफसी कार्यालयात पोहचल्यानंतर मात्र आमच्याकडे साडे सहा लाख रुपये जमा करा, त्यानंतर लगेच तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल असं सांगण्यात आले. त्याशिवाय आमच्याकडे दुसराच पर्यायच नव्हता.
स्क्रीनिंगसाठी तीन लाख रुपये
त्यामुळे आम्ही सीबीएफसीमध्ये स्क्रीनिंगसाठी तीन लाख रुपये आणि प्रमाणपत्रासाठी साडेतीन लाख रुपये द्यावे लागल्याची धक्कादायक माहिती त्यांनी सांगितली. या सर्व प्रकारामुळेच आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे.
हे ही वाचा >> उत्तर दिलं नाही म्हणून विद्यार्थ्यासोबत असं काही केलं की शिक्षिकेला झाली अटक
मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे तक्रार
आमच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर संवाद साधला. त्यावेळी त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. अभिनेता विशालने केलेल्या व्हीडीओमध्ये एका महिलेचे नाव घेतले आहे. त्या महिलेने पैसे ट्रान्स्फर केल्याचेही त्यांनी सांगितले. हा प्रकार जर सीबीएफसी कार्यालयात घडत असेल तर धक्कादायक आहे. त्यामुळे चित्रपट प्रसिद्ध करण्यासाठी सरकारी कार्यालयातील ही परिस्थिती असेल तर यामध्ये असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT