Bademiya: हे काय… मुंबईतील प्रसिद्ध ‘बडेमिया’च्या किचनमध्ये उंदीर-झुरळं, FDA ही अवाक्

मुंबई तक

14 Sep 2023 (अपडेटेड: 14 Sep 2023, 01:56 PM)

Cockroach and Rats found in Bademiya kitchen: मुंबईतील प्रसिद्ध बडेमिया हॉटेल हे एफडीएकडून सील करण्यात आलं आहे. या हॉटेलच्या किचनमध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर आणि झुरळं आढळून आले आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

mumbai famous bademiya hotel sealed fda raid after cockroach and rats found in kitchen

mumbai famous bademiya hotel sealed fda raid after cockroach and rats found in kitchen

follow google news

FDA raid on Mumbai’s famous Bademiya Restaurant: दीपेश त्रिपाठी, मुंबई: मुंबईच्या कुलाबा परिसरातील प्रसिद्ध बडेमिया (BADEMIYA) हॉटेल हे तेथील कबाब आणि तंदूरी पदार्थांसाठी खूपच प्रसिद्ध आहे. पण याच हॉटेलवर काल (13 सप्टेंबर) अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) च्या व्हिजिलन्स खात्याच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. धक्कादायक बाब म्हणजे या हॉटेलमधील किचनमध्ये FDA च्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात उंदीर आणि झुरळं आढळून आले. तसेच येथे प्रचंड अस्वच्छता असल्याचंही पाहायला मिळालं. (mumbai famous bademiya hotel sealed fda raid after cockroach and rats found in kitchen)

हे वाचलं का?

ज्यामुळे आता या हॉटेलवर एफडीएकडून कारवाई करण्यात आली आहे. येथील किचन हे सील करण्यात आले आहेत. याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे बडेमियासारख्या मोठ्या हॉटेलकडे FSSAI परवानाच नाही. त्यामुळेच 76 वर्ष जुन्या हॉटेलवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

‘बडेमियाच्या किचनमध्ये सापडले झुरळ आणि उंदीर’

याच प्रकरणी एफडीएचे व्हिजिलेन्स असिस्टेंट कमिश्नर विलास इंगळे यांनी मुंबई Tak शी खास बातचीत करताना माहिती दिली की, ‘मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट याची तपासणी सुरू आहे. जे नामांकित हॉटेल्स आहेत तिथे नामांकित लोकं जातात.. तसेच इतर हॉटेल्सची देखील आता तपासणी सुरू आहे. त्यापैकीच बडेमिया हॉटेलही आहे. एका मोहिमेअंतर्गत आमची व्हिजिलन्सची टीम आणि आमचे लोकल अधिकारी आले होते. इथे आल्यानंतर आम्हाला असं पाहायला मिळालं की, यांचे दोन सेंट्रल किचन आहेत. जिथे जेवण बनवलं जातं. तसेच बाजूलाच असलेल्या आऊटलेटमध्ये ग्राहकांना जेवण दिलं जातं.’

‘पण सेंट्रल किचनची पाहणी केल्यानंतर आम्हाला आढळून आलं की, ते परवान्याशिवायच सुरू आहे. जिथे आम्हाला उंदीर आणि झुरळं आढळून आले. संपूर्ण किचनमध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर आणि झुरळं होतीच पण प्रचंड अस्वच्छता देखील होती.’

हे ही वाचा>> Viral Video: विमानाच्या वॉशरूममध्ये जोडप्याचा सेक्स, अचानक दरवाजा उघडला अन्…

‘त्यामुळे आम्ही त्यांच्या तीनही युनिटीची तपासणी केली आहे. आता यामध्ये जी अनियमितता आढळून आली आहे.. ते पाहून कारवाई केली.’ असं ते म्हणाले.

‘आमच्याकडे लायसन्स नाही, पण…’

दरम्यान, या धाडीनंतर बडेमियाचे मालक मोहम्मद इफ्तखार शेख यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं की, ‘आता जे आदेश आहेत त्याचं आम्ही पालन करू. आता आम्हाला साहेबांनी सांगितलं की, आमच्याकडे एफडीएचा परवाना नाही. त्यासाठी आम्ही अर्ज केला आहे. त्याशिवाय इतर परवाने आमच्याकडे आहेत. आरोग्य विभाग आणि मुंबई महापालिकेचे संबंधित परवाने आमच्याकडे आहेत.’ असं ते म्हणाले.

ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी

बडेमियामधील मांसाहारी पदार्थ खाण्यासाठी अनेक लोक दुरून येतात. त्यामुळे येथे नेहमीच खवय्यांची मोठी रांग पाहायला मिळते. तसेच इतर हॉटेलच्या तुलनेने येथील पदार्थांचे दरही चढेच आहेत. मात्र, त्याकडे कानाडोळा करत अनेकदा खवय्ये येथे येत असतात.

हे ही वाचा>> Viral News : बापरे! व्हिटॅमिनची गोळी समजून गिळली भलतीच गोष्ट, अन्…

मात्र, आता एफडीएच्या धाडीनंतर बडेमिया हॉटेलबाबत जे सत्य समोर आलं आहे. त्यामुळे खवय्यांना मोठा धक्का बसला आहे. इतक्या आलिशान परिसरातील हॉटेलमध्ये अशा प्रकारची अस्वच्छता असल्याचं समोर आल्यानंतर अनेकांनी याबाबत सोशल मीडियावरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे.

    follow whatsapp