cheetah died in india : भारतात नामशेष झालेली चित्ता प्रजाती वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असून, यासाठी नामिबियातून चित्ते आणण्यात आले आहेत. हाती घेण्यात आलेल्या चित्ता प्रोजेक्ट पहिला धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील श्योपूर स्थित असलेल्या कुनो राष्ट्रीय अभरण्यात सोडण्यात आलेल्या चित्त्यांपैकी एका मादीचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (27 मार्च) रात्री चित्ता मादीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचं कारण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात आलेल्या साशा नावाच्या चित्ता मादीचा मृत्यू झाला आहे. कुनो प्रशासनाकडून याची माहिती देण्यात आली. भारतात आणण्यापूर्वी साशा किडनीच्या व्याधीमुळे त्रस्त होती. नामिबियामध्ये तिची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. दरम्यान, साशाचं शवविच्छेदन करून अभयारण्या प्रशासनाकडून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
साशा चित्त्याचा मृत्यू : कुनो राष्ट्रीय अभयारण्य प्रशासनाने काय सांगितले?
श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात चित्ता प्रोजेक्ट सुरू आहे. भारतातील चित्त्याचं घर बनलेल्या या अभयारण्यात नामिबियातून 8, तर दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आले आहेत. या चित्त्यांना परदेशातून आणल्यानंतर सुरूवातील विलगीकरणात ठेवले गेले. त्यानंतर जंगलात सोडले जात होते. त्याच दरम्यान साशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
हेही वाचा – भारतात आणलेल्या चित्त्यांमागचं नागपूरमधलं मराठी कनेक्शन माहित आहे का?
साशा चित्ता मादी आजारी असल्याचे लक्षणे जानेवारी 2022-23 दिसून आली होती. त्यानंतर तिला मोठ्या बंदिस्त जागेतून छोट्या बंदिस्त जागेत हलवण्यात आले होते. साशा काहीही खात नव्हती आणि शांत शांत राहत होती.
हेही वाचा – ‘प्रोजेक्ट चित्ता’ प्रस्ताव 2009 मधील; मनमोहन सिंह यांनी करारही केला होता -काँग्रेस
साशा आजारी असल्याचे लक्षणे दिसून आल्यानंतर कुनो राष्ट्रीय अभयारण्यातील तीन डॉक्टर आणि भोपाळवरून आलेल्या डॉक्टरांनी तिची तपासणी केली. त्यानंतर साशाच्या किडनीमध्ये संसर्ग झाला असल्याचं आढळून आले. तेव्हापासून साशा आजारी होती. तिच्यावर डॉ. एड्रियन टोरडीफ यांच्या सल्लानुसार उपचार केले गेले, मात्र तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
नामिबियातून आणलेले 4 चित्ते जंगलात
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नामिबियातून आणण्यात आलेल्या 8 चित्त्यांपैकी 7 चित्ते आता असून, त्यातील 3 नर आणि 1 मादी जंगलात सोडण्यात आलेली आहे. त्यांची तब्येत चांगली असून, नेहमीप्रमाणे ते शिकारही करत आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आलेले 12 चित्ते सध्या विलगीकरणात आहेत. त्यांना बंदिस्त जागेत ठेवण्यात आलेले असून, त्यांची प्रकृतीही चांगली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT