Neha Narkhede : भारतीय वंशाची तंत्रज्ञान उद्योजक नेहा नारखेडेची अमेरिकेतील आर्थिक तसेच व्यावसायिक यशस्वी महिलांमध्ये गणना केली जाते. तंत्रज्ञानात जगातील सर्वात यशस्वी महिलांमध्येही नेहाची गणना होते. पुण्यात राहणाऱ्या नेहा नारखेडे हिला गेल्या महिन्यात फोर्ब्सने जाहीर केलेल्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिलांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. (Neha Narkhede of Pune set up 75 thousand crores company in America)
ADVERTISEMENT
नेहाची एकूण संपत्ती 520 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 42 हजार कोटी रुपये आहे. ती क्लाउड सेवा प्रदान करणार्या सॉफ्टवेअर कंपनी कॉन्फ्लुएंटची सह-संस्थापक आणि बोर्ड सदस्य आहे. कॉन्फ्लुएंटचे मूल्य 9.1 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 75 हजार कोटी रुपये आहे. यामध्ये नेहाची कंपनीत 6 टक्के भागीदारक आहे.
वाचा : मोठी बातमी: सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांना बजावली नोटीस, पण…
नेहा नारखेडेची यश्वसी कहाणी काय आहे?
नेहा नारखेडे ही पुण्याची रहिवासी आहे. तिचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यातच झाले. 2006 मध्ये नेहा तिच्या मास्टर्सच्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेली होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नेहाने दोन वर्ष ओरॅकलमध्ये तांत्रिक कर्मचारी म्हणून काम केले. यानंतर ती लिंक्डइनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कामाला लागली. रुजू झाल्यानंतर वर्षभरातच तिला सिनीयर सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून बढती मिळाली.
त्यानंतर वर्षभरात तिला प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून बढती मिळाली. पुन्हा एका वर्षानंतर, ती LinkedIn वर स्ट्रीम इन्फ्रास्ट्रक्चर लीड बनली. LinkedIn वर असताना, नेहा आणि तिच्या टीमने Apache Kafka विकसित केली. ही एक ओपन सोर्स मेसेजिंग सिस्टम आहे जी साइटचा डेटा हाताळण्यासाठी तयार करण्यात आली होती.
वाचा : ‘चांद्रयान-3’ चे कणखर नेतृत्व करणारी ही ‘रॉकेट वुमन’ आहे तरी कोण?
2014 मध्ये, नेहा आणि तिच्या दोन लिंक्डइन सहकाऱ्यांनी नोकरी सोडली आणि कॉन्फ्लुएंट सुरू केले. Confluent ही क्लाउड सोल्यूशन देणारी कंपनी आहे जी विविध कंपन्यांना मोठ्या प्रमाणात डेटा प्रोसेस करण्यास मदत करते. नेहा पाच वर्षे कंपनीची मुख्य तंत्रज्ञान आणि उत्पादन अधिकारी होती. सध्या ती कंपनीची बोर्ड मेंबर आहे. त्याचवेळी नेहाने 2021 मध्ये ऑसिलेटर नावाची कंपनी सुरू केली. ती या कंपनीची सीईओ आहेत.
नेहासाठी वडील हे प्रेरणास्त्रोत!
नेहाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या यशामागे तिच्या वडिलांचा मोठा हात आहे. ती म्हणाली होती की, लहानपणी तिचे वडील तिच्यासाठी पुस्तके आणायचे आणि तिला खूप उंची गाठलेल्या महिलांच्या कथा सांगायचे. इंदिरा गांधी, इंद्रा नूयी, किरण बेदी यांच्या कथा वाचून तिला प्रेरणा मिळायची.
वाचा : Vijay Darda आणि त्यांचा पुत्र कोळसा घोटाळा प्रकरणी दोषी, ‘या’ दिवशी ठरणार शिक्षा
नेहा नारखेडेची एकूण संपत्ती किती?
नेहा नारखेडे, जी कॉन्फ्लुएंट नावाच्या कंपनीची सह-संस्थापक आहे, ती भारतातील अनेक तरुणींसाठी प्रेरणास्थान बनली आहे. नेहा 42 हजार कोटी रुपयांच्या अंदाजे संपत्तीसह हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये 336 व्या स्थानावर आहे.
ADVERTISEMENT