Reliance Industries: आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कंपनीत आता अनेक नवनवे बदल होत आहे. अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) संचालक मंडळात आता अनंत अंबानी यांचा समावेश करण्यात आली आहे. मात्र त्यांच्यात आता अडचणी निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या रिलायन्सच्या एजीएममध्ये आकाश, ईशा आणि अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र आता रिलायन्स बोर्डाच्या जागेसाठी अनंत अंबानींना दोन सल्लागार कंपन्यांकडून विरोध होत आहे. तो विरोध का होतो आहे त्याच प्रकरणाची आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
ADVERTISEMENT
अनंत अंबानीच्या नियुक्तीलाच विरोध
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार दोन्ही आंतरराष्ट्रीय प्रॉक्सी सल्लागार फर्म संस्थात्मक शेअरहोल्डर सर्व्हिसेस इंक (ISSI) आणि मुंबईतील संस्थात्मक गुंतवणूकदार सल्लागार सेवा (IIAS) यांनी अनंत अंबानी यांच्या बोर्डावरील नियुक्तीला समर्थन दिले नाही. त्याचे कारण देताना त्यांनी त्यांच्या वयाचा दाखला दिला आहे.
हे ही वाचा >>MLA Disqualification : ‘शेवटची संधी देतोय’, सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांवर संतापले
अंबानींच्या विरोधातच मतदानाचा फतवा
या दोन्ही सल्लागार कंपन्यांकडून रिलायन्सच्या भागधारकांना मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज बोर्डावर नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवत त्यांच्या विरोधात मतदान करण्याच्या शिफारस केली आहे.
वयाने अगदी तरुण
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ISSI कडून 12 ऑक्टोबर रोजी सूचना देण्यात आली. त्यामध्ये मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या वय आणि अनुभवावर त्यामध्ये सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यामध्ये असंही सांगण्यात आले होते की, कारण अनंत अंबानी हे अगदीच तरुण आहेत. त्यातच त्यांना फक्त 6 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाविरोधात आम्ही असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >>‘शाहरुख खान, स्टॅलिन यांना गोळ्या घालणाऱ्यांना 25 कोटी’, जगद्गुरु परमहंस आचार्य कोण?
नियुक्तीला मार्गदर्शक तत्वांची आड
तर दुसरीकडे अनंत अंबानींपेक्षा मोठी असणाऱ्या ईशा आणि आकाश अंबानी यांच्या नियुक्तीला मात्र समर्थन देण्यात आले आहे. यापूर्वी, IIAS ने 9 ऑक्टोबर रोजी एका अहवालात म्हटले होते की, अनंत अंबानी यांची वयाच्या 28 व्या वर्षी झालेली नियुक्ती ही कोणत्याच मार्गदर्शक तत्वानुसार नसल्याचे सांगण्यात आले होते.
अनुभवाची परिपक्वतेची कमतरता
रिलायन्सच्यातर्फे अनंत अंबानी यांच्या नियुक्ती विरोधात गेलेल्या दोन प्रॉक्सी कंपन्यांना अंबानीकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, अनंत अंबानी यांच्याकडे समूहाच्या व्यवसायात सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बोर्डात सामील होण्यासाठी संबंधित अनुभव आणि परिपक्वता आहे. तसेच अनेक वर्षांपासून वरिष्ठ नेतृत्वाकडूनही त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे अनंत अंबानी हे रिलायन्स बोर्डाच्या बैठकींमध्येही योगदान देऊ शकतात असं स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
रिलायन्सची भागीदारी किती?
रिलायन्समध्ये संस्थापकांची 41 टक्के भागीदारी आहे, तर परदेशी आणि स्थानिक संस्थांची 40 टक्के आहे. त्यामुळे त्यांनी प्रॉक्सी फर्मच्या सूचनांवर मते दिली आहेत. 26 ऑक्टोबर पर्यंत अनंत अंबानी यांची बोर्डावर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावर शेअरधारकांना मत द्यायचे असून आता त्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
व्यावसायिकतेचा अनुभव चांगला
एकीकडे ISSI आणि IIAS अनंत अंबानींच्या नियुक्तीच्या विरोधात आहेत, तर दुसरीकडे दुसरी आंतरराष्ट्रीय प्रॉक्सी फर्म ग्लास लुईस अनंत अंबानी यांना पाठिंबा देत आहे. या फर्मचे संचालक डेकी विंडार्टो यांनी सांगितले की, केवळ अनुभवाच्या आधारे ते अनंत अंबानींना विरोध करत नाहीत. तर ग्लास लुईस म्हणाले की, मुकेश अंबानींची इतर दोन मुलं, आकाश अंबानी आणि ईशा अंबानी, यांना व्यावसायिकतेचा चांगलाच अनुभव आहे. तसेच ते अनंत अंबानींपेक्षा तीन वर्षांनी मोठे असल्यामुळे त्यांना मतदान देण्यास तयार आहेत.
ADVERTISEMENT