9 girls drowned in Khadwasla water : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्याला पाणीपुरवठा होत असलेल्या खडकवासला धरणात नऊ मुली बुडाल्या. या मुली पोहण्यासाठी धरणात उतरल्या होत्या, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं 9 जणींही बुडाल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचाव मोहीम हाती घेण्यात आली. या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. तर चंद्रपुरातही चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
गोरेखुर्द तालुक्यातून एक कुटुंब खडवासला धरणावर अंत्यसंस्कारानंतरचे धार्मिक विधी करण्यासाठी आले होते. या कुटुंबासोबत या मुली आल्या होत्या. दोंजे येथील धरणाजवळ धार्मिक विधी सुरू असताना मुली पाण्यात उतरल्या होत्या.
हेही वाचा >> …म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडली, गुलाबराव पाटलांनी सगळंच सांगितलं
पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर 9 मुलींना पाण्याचा अंदाज आला नाही. त्या तिघी अचानक पाण्यात बुडाल्या. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर यांची माहिती पोलीस आणि अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली.
पाच जणींना वाचवण्यात यश, दोघींचा मृत्यू
पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने बचाव मोहीम हाती घेत पाच मुलींना पाण्यातून बाहेर काढले. पाच मुलींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असून, चार मुलींचा शोध घेत असताना दोघींचे मृतदेह सापडले. इतर दोघींचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
गडचिरोलीत चार तरुणांचा बॅरेजजवळ बुडून मृत्यू
रविवारी दुपारी मोनु त्रिलोक शर्मा (वय 26, रा. गडचिरोली), प्रफुल विठ्ठल येलुरे (वय 20), शुभम रुपचंद लांजेवार (वय 24), महेश मधुकर घोंगडे (वय 20, सर्व रा. कृषक हायस्कूल जवळ चामोर्शी) असे 4 युवक फिरायला गेले होते.
पोहण्याची इच्छा झाल्याने उतरले पाण्यात
गडचिरोली जिल्ह्यातील चिचडोह बॅरेजच्या दरवाज्याखाली खोलगट भागात पोहण्यासाठी गेले होते. चारही युवक चिचडोह बॅरेजवर फिरायला गेले होते. दरम्यान, त्या युवकांना पोहण्याचा मोह झाल्याने ते बॅरेजच्या पाण्यात उतरले. अशातच चार युवक खोलगट भागात गेल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
हेही वाचा >> Karnataka : सर्वात मोठा विजय! BJP, JD(S) चे बालेकिल्ले काँग्रेसने कसे बळकावले?
घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस व बचाव पथकाने घटनास्थळ गाठून जिवाची पर्वा न करता बोट वा डोंगा उपलब्ध नसल्याने त्यांनी स्वतःला दोरखंड बांधून खोल पाण्यात उड्या मारल्या. साधारणतः एक तास शोधमोहीम राबविल्यावर चारही युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. स्थानिक युवकांनी पोलिसांना याकामी मदत केली.
ADVERTISEMENT