पुणे कोयता हल्ला: ‘जात कुठली?’, लेशपाल संतापला.. सोशल मीडियावर ‘त्यांची’ काढली अक्कल!

मुंबई तक

• 02:54 PM • 28 Jun 2023

पुण्यातील तरुणीचा जीव वाचविणाऱ्या लेशपाल याला आता अनेक जण मारेकरी तरुण आणि पीडित तरुणीची जात विचारत आहेत. ज्याबाबत सोशल मीडियावरुन लेशपाल याने आपला संताप व्यक्त केला आहे.

pune sadashiv peth girl attack mpsc student leshpal cast accused boy victim girl anger social media

pune sadashiv peth girl attack mpsc student leshpal cast accused boy victim girl anger social media

follow google news

MPSC Leshpal Javalge: पुणे: पुण्यात (Pune) 27 जून रोजी भररस्त्यात थरार घडला. मध्यवर्ती सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) एका तरुणाने भररस्त्यात तरुणीवर कोयत्यानं वार केला. पण याच वेळी लेशपाल जवळगे (Leshpal Javalge) या MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणानं कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवलं. आता लेशपालनं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटला एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामधून त्यानं आपल्या पोस्टमधून अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आहे. (pune sadashiv peth girl attack mpsc student leshpal caste accused boy victim girl anger social media)

हे वाचलं का?

कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवल्यानंतर लेशपालचं सर्वत्र कौतुक होत आहे. अजित पवारांपासून तर राज ठाकरेंपर्यंत सर्वांनी त्याचं कौतुक केलं आहे. त्यानंतर आता लेशपालनं एक पोस्ट शेअर केली आहे.

पुण्यातील कोयता हल्ल्यानंतर लेशपाल हा एका दिवसात प्रचंड चर्चेत आला. अनेकांनी त्याचं सोशल अकाउंट शोधून त्याच्या धाडसाचं कौतुक केलं. पण असं असताना काही जणांनी मारेकरी तरुणी आणि पीडित तरुणीची थेट जातही विचारली.

हे ही वाचा >> Bakra Eid 2023: ‘बकऱ्या’वरुन राडा, मीरा रोडच्या सोसायटीत घडलं तरी काय?

तरुण आणि तरुणीची जात विचारल्याचं लेशपाल हा मात्र, संतप्त झाला. ज्यानंतर लेशपालने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली. त्यामध्ये तो म्हणतो, ‘त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली होती असं मला मेसेज करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलीट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकत… नाही समाजाचे… कीड लागली आहे तुमच्या वरच्या थोड्याफार असलेल्या भागाला’, अशा शब्दात त्यानं जात विचारणाऱ्या लोकांना सुनावलं.

हल्ली कुठलीही घटना घडली की आरोपी किंवा पीडितेचा जात-धर्म शोधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. या कोयता हल्ल्यातही असाच काहीसा प्रकार घडल्याचं लेशपालच्या इंस्टाग्राम पोस्टवरून दिसतं आहे.

लेशपालने कसं वाचवले तरुणीचे प्राण?

सदाशिव पेठेतील घटनेनंतर लेशपाल याने माध्यमांशी संवाद साधताना या घटनेबाबत नेमकी माहिती दिली.’मी पहिल्यांदा अभ्यासिकेत येत होतो.. आज तसा मला थोडा उशीरच झाला होता. इकडून ती मुलगी धावत येत होती. पहिल्यांदा इथे तिच्यावर वार बसला.. कोयता बघून लोकं सगळे पांगले बाजूला.. ही खूप मोठी सामाजिक विकृती आहे ही. कोणीच पकडायला येत नव्हतं. का तर त्याच्या हातात कोयता होता. मुलगा काय खूप मोठा नव्हता किंवा धाडसी नव्हता. फक्त त्याच्या हातातील हत्यार बघून लोक पांगत होते. बघ्याची भूमिका घेत होते. मुलगी खूप ओरडत-ओरडत पलीकडे आली. मी तिकडे उभा होतो. मी बघितलं मुलगी धावताना… पहिल्यांदा तो मुलगा मला दिसला नाही. मुलगी पुढे गेल्यावर मी पाहिलं तर हा मुलगा कोयता घेऊन तिच्या मागे पळत होता.’

‘मी लगेच बॅग टाकली. तोपर्यंत तो मुलगा कोयता घेऊन तिच्यामागे पळत होता. तोपर्यंत तो तिच्यापर्यंत पोहचला. ती त्या बेकरीच्या इथे खाली बसली स्वत:ला वाचवा म्हणवत. हा कोयत्याने जोरदार तिच्यावर वार करणार होताच. तेवढ्यात मी तिथवर पोहचलोच. त्याचा कोयता वरच्यावर पकडला. नंतर एक मुलगा माझ्या मदतीला पण आला. आम्ही त्याला पकडून पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन गेलो.’

हे ही वाचा >> Pune Crime: ‘आज एक तरी मर्डर करतोच..’, पुणे कोयता हल्ल्याची Inside Story

‘मला खूप लाज वाटली समाजाची.. दर्शना पवारची केस राजगडला झाली आता. आठ दिवस झाले नाहीत त्या घटनेला. तोपर्यंत दुसरी विकृती घडते सदाशिव पेठेत.’ असं म्हणत लेशपालने या घटनेबाबत आणि इतर नागरिकांबाबत संतापही व्यक्त केला.

लेशपाल हा तरुण MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक उमदा तरूण आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो पुण्यात राहतो आहे. इथेच तो आपल्या परीक्षेची तयारी करत आहे. याशिवाय त्याचा क्रीडा क्षेत्राची आणि विशेषत: कबड्डीची अधिक आवड आहे.

    follow whatsapp