Raksha Bandhan Celebration 2023 : लोक यावर्षी रक्षाबंधनची (Raksha Bandhan 2023 ) तारीख आणि शुभ मुहूर्त यामध्ये खूप गोंधळलेले आहेत. काही लोक 30 तर काहीजण 31 ऑगस्टला राखी बांधली जाईल असं म्हणत आहेत. याबाबतच आज आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Raksha Bandhan 2023 How many hours is the auspicious time to tie rakhi)
ADVERTISEMENT
ज्योतिष शास्त्रानुसार, रक्षाबंधनचा सण यावर्षी 30 आणि 31 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. रक्षाबंधनचा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या वेळी पौर्णिमा तिथी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:59 वाजता सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7:50 वाजता समाप्त होईल. पण, यावेळी 30 आणि 31 ऑगस्ट या दोन दिवशी रक्षाबंधनचा सण का साजरा केला जाईल, जाणून घेऊया?
LPG सिलिंडरच्या किंमतीत कपात, रक्षाबंधनची भेट की, राजकारण; नेमकं काय?
रक्षाबंधन 2023 शुभ मुहूर्त
ज्योतिषांच्या मते, 30 ऑगस्टला पौर्णिमा तिथीसह भद्रा काळ सकाळी 10.59 वाजता सुरू होईल आणि भद्रा काळ रात्री 9.02 वाजता समाप्त होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रात भद्रा हा अशुभ काळ मानला जातो आणि या काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. त्यामुळे 30 ऑगस्ट रोजी रात्री 9.02 नंतर राखी बांधता येईल.
पौराणिक मान्यतेनुसार दुपारची वेळ राखी बांधण्यासाठी शुभ असते. पण जर दुपारी भद्रा काळ असेल तर प्रदोष काळात राखी बांधणे शुभ असते. अशा वेळी 30 ऑगस्टला भद्राकाळ असल्याने राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नसणार. त्या दिवशी रात्रीच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे.
31 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा सकाळी 07.05 पर्यंत आहे, या काळात भद्राची सावली नाही. यामुळे, 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 च्या शुभ मुहूर्तावर तुम्ही राखी बांधू शकता. 30 आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाऊ शकतो.
Shiv Sena UBT: ‘मोदी-शहांच्या कुंडलीत राजयोग नाही तर चोऱ्यामाऱ्या..’, सामनातून ठाकरेंची घणाघाती टीका
राखी बांधण्यासाठी एकूण 10 तासांचा शुभ मुहूर्त असेल, ज्यामध्ये राखी बांधणे सर्वात शुभ मानले जाते. म्हणजेच, 30 ऑगस्ट रोजी तुम्ही रात्री 9:00 नंतर राखी बांधू शकता आणि त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7:05 च्या आधी राखी बांधू शकता.
भद्रा काळात राखी का बांधली जात नाही?
भद्रा काळात रक्षाबंधनाला राखी बांधू नये. त्यामागे एक कहाणी आहे. भद्रा काळातच लंकापती रावणाच्या बहिणीने मनगटावर राखी बांधली होती आणि वर्षभरातच ती नष्ट झाली होती. भद्रा ही शनिदेवाची बहीण होती असे म्हणतात. भद्राला ब्रह्मदेवाकडून हा शाप मिळाला होता की जो कोणी भद्रामध्ये शुभ कार्य करेल त्याचे फळ अशुभ मिळेल.
Chandrayaan-3 : चांद्रयान मोहिमेत दुसरं मोठं यश,चंद्रावर आता आणखी काय सापडलं?
रक्षाबंधन 2023 पूजा विधी
राखी बांधण्यापूर्वी बहीण आणि भाऊ दोघेही व्रत करतात. भावाला राखी बांधण्यापूर्वी बहिणीने ताट सजवावे. ताटात राखी, दिवा, कुंकू, तांदूळ आणि मिठाई ठेवा. राखी बांधताना सर्वप्रथम भावाच्या कपाळावर टिळक लावा. त्यानंतर भावावर तांदूळ शिंपडा. बहिणी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधते. राखी बांधल्यानंतर बहिणीने भावाची आरती करावी. भाऊ मोठा असेल तर त्याच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या. नंतर भावाला मिठाई खाऊ घाला. बहिणीला राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या क्षमतेनुसार बहिणीला भेटवस्तू देतो. राखी बांधताना बहिणींनी मंत्राचा जप करावा.
राखी बांधताना बहिणीने भावासाठी कोणता मंत्र जपावा?
रक्षाबंधन हा सण एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी, काळजी आणि भाऊ-बहिणीच्या रक्षणाचा सण आहे. शतकानुशतके हा सण साजरा केला जातो. जे सध्याच्या काळात खूप महत्वाचं आहे. असं मानलं जातं की रक्षासूत्र बांधताना काही मंत्रांचा जप करावा आणि प्रेम सहकार्याचे वचनही घ्यावे.
येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल:।
तेन त्वाम् प्रतिबद्धनामि, रक्षे माचल माचल:।।
ADVERTISEMENT