What is Pran Pratishtha in Marathi : दीर्घ प्रतिक्षेनंतर २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. १६ जानेवारीपासून अयोध्येत प्राणप्रतिष्ठा पूजा सुरू झाली होती. पण, प्राणप्रतिष्ठा का केली जाते? मूर्तीतमध्ये देवाचे अस्तित्व आणणारी ही पूजा काय असते, हेच जाणून घ्या.
ADVERTISEMENT
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेसाठी २२ जानेवारी २०२४ रोजीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी पूजा सुरू झाली. विशेष मंत्रोच्चारात रामलल्लाला स्नान घालण्यात आले. त्यानंतर विधिवत वस्त्र नेसवण्यात आली. त्यानंतर आरती करण्यात आली.
प्राणप्रतिष्ठा का असते आवश्यक?
हिंदू धर्मानुसार कोणत्याही मंदिरात देवी-देवतांची मूर्ती स्थापन करण्याआधी त्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक असते. प्राणप्रतिष्ठेचा अर्थ आहे की मूर्तीमध्ये प्राण आणणे. जिवंत शक्ती आणणे. तोपर्यंत मूर्ती देव नसते. देवाचे प्राण त्यात आणण्यासाठी प्राणप्रतिष्ठा करावीच लागते.
हेही वाचा >> लालकृष्ण अडवाणी आमंत्रण मिळूनही अडवाणी गेले नाही रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला, कारण…
कोणत्याही मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी धर्मशास्त्रानुसार विधी आणि मंत्रोच्चार करून पूजा केली जाते. कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना अनेक टप्पे पार करावे लागतात. या सर्व अवस्थांना सहवास म्हणतात.
हिंदू धर्मातील पुराण आणि ग्रंथांमध्ये प्राणप्रतिष्ठेचे वर्णन केले आहे. हिंदू धर्म ग्रंथानुसार प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय कोणत्याही मूर्तीची पूजा करता येत नाही. प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्ती निर्जीव राहते आणि प्राणप्रतिष्ठेनंतरच ती सजीव होऊन पूजेस पात्र होते.
प्राणप्रतिष्ठेची संपूर्ण प्रक्रिया काय आहे?
प्राणप्रतिष्ठे दरम्यान अनेक टप्पे असतात, ज्याला अधिवास म्हणतात. अधिवास ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये मूर्तीचे विविध गोष्टींमध्ये बुडवली जाते. या प्रक्रियेअंतर्गत मूर्ती प्रथम पाण्यात ठेवली जाते. त्यानंतर मूर्ती धान्यात ठेवली जाते. यानंतर ही मूर्ती फळांमध्ये ठेवली जाते आणि नंतर औषध, केशर आणि नंतर तूपात ठेवली जाते.
या प्रक्रियेनंतर मूर्तीला विधीपूर्वक आंघोळ घालण्यात येते. यादरम्यान मूर्तीला विविध साहित्याने आंघोळ करून अभिषेक केला जातो. स्नानानंतर विविध मंत्रांचा उच्चार करून देवाला जागृत केले जाते. त्यानंतर प्राणप्रतिष्ठेची पूजा सुरू होते.
हेही वाचा >> महाराष्ट्राचा खारीचा वाटा! राम मंदिरासाठी पाठवली ‘ही’ महत्त्वाची गोष्ट!
पूजेदरम्यान, मूर्ती पूर्वेकडे तोंड करून ठेवली जाते आणि त्यानंतर सर्व देवी-देवतांना आवाहन केले जाते आणि या शुभ कार्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते. यावेळी मंत्रांचा उच्चार केला जातो.
यानंतर सर्व पूजाविधी पार पाडल्या जातात. या वेळी परमेश्वराला नवीन वस्त्रे परिधान करून सजविले जाते. अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला आरसा दाखवला जातो. असे मानले जाते की देवाचे डोळे इतके तेजस्वी असतात की, केवळ देव स्वतःच त्याचे तेज सहन करू शकतो. शेवटी आरती झाल्यानंतर लोकांमध्ये प्रसादाचे वाटप केले जाते.
ADVERTISEMENT