Mumbai Siddhivinayak Mandir Prasad Video Viral: मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाता खळबळजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंदिरातील महाप्रसादात उंदराने पिल्लांना जन्म दिल्याचं समोर आलं आहे. हा धक्कादायक व्हिडीओ समोर येताच मंदिर समितीच्या सचिव वीणा पाटील यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, हे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज तपासावे लागेल. व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये पाहू शकता की, सिद्धीविनायक मंदिरातील महाप्रसादात उंदराचे पिल्ले असल्याचं दिसत आहेत. उंदरांनी प्रसादाचे अनेक पॅकेट कुरतडलेले आहेत. याप्रकरणी मंदिर प्रशासनाने चौकशीची मागणी केली आहे. एनडी टीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
ADVERTISEMENT
प्रसादासाठी दररोज तयार होतात 50 हजार लाडू
रिपोर्टनुसार, मंदिर परिसरात प्रसादासाठी दररोज 50 हजार लाडू बनवले जातात. उत्सवदरम्यान लाडुंची मागणी खूप वाढते. प्रसादासाठी 50-50 ग्रॅमचे दोन लाडू पॅकेटमध्ये असतात. अन्न आणि औषध प्रशासनाकडून लाडूत वापरेल्या पदार्थांना सर्टिफाईडही केलं जातं.
हे ही वाचा >> Mumbai: पहाटे 4 वाजता अचानक उडाली लोकांची झोप; मुंबईतील सर्वात थरारक Video 'तुफान' व्हायरल
मंदिर परिसरातील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह
लॅब टेस्टच्या माहितीनुसार, महाप्रसादाच्या लाडूंना 7 ते 8 दिवस सुरक्षित ठेवलं जातं. परंतु, प्रसादात उंदाराची पिल्ल दिसल्यानंतर अनेकांनी मंदिर परिसरातील स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
व्हिडीओ खरा आहे का? मंदिर प्रशासनाने केला सवाल
मंदिर समितीच्या सचिव वीणा पाटील यांनी म्हटलंय की, हा फोटो सिद्धीविनायक मंदिरातील आहे, असं वाटत नाही. हे फोटो मंदिरातील आहेत, असंही वाटत नाही. या व्हिडीओचा पुरावाही आम्हाला द्यावा. आम्ही या प्रकाराची चौकशी करु.
हे ही वाचा >> Akshay Shinde Encounter :एन्काऊंटर की हत्या? आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? खासदार नरेश म्हस्के म्हणाले..
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धीविनायक मंदिरात महाप्रसादात उंदराची पिल्ले आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. प्रसादात असलेलया उंदरांचा व्हिडीओ आणि फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. परंतु, व्हायरल झालेली पोस्ट खरी आहे नाही, याबाबत मंदिर प्रशासनाने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. प्रसादाचा व्हिडीओ याच मंदिराचा असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. पण हा व्हिडीओ सिद्धीविनायक मंदिरातील आहे का? याबाबत तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT