Rohit Pawar यांना ईडीचा झटका! 161 एकर जमिनीसह कोट्यवधींची संपत्ती जप्त, प्रकरण काय?

दिव्येश सिंह

08 Mar 2024 (अपडेटेड: 08 Mar 2024, 05:36 PM)

Rohit Pawar gets big set back by ED

NCP leader Rohit Pawar; (Photo: Mandar Deodhar)

NCP leader Rohit Pawar; (Photo: Mandar Deodhar)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रोहित पवारांना ईडीकडून झटका

point

महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई

point

बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडने खरेदी केलेल्या कारखान्यावर कारवाई

Rohit Pawar : महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडच्या ताब्यात असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची तब्बल 161.30 एकर जमिनीसह कोट्यवधी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (ED has attached 161.30 acres of land, plant & machinery and building structures of a sugar unit at Kannad sugar karkhana in possession of M/s Baramati Agro Ltd.)

हे वाचलं का?

50.20 कोटी रुपयात खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची 161 कोटी रुपये मूल्य असलेली मालमत्ता ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग (पीएमएलए), २००२ कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 

प्रकरण काय?

बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडकडे मालकी असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून बेकायदेशीरपणे 50.20 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचा कथित आरोप आहे. बेकायदेशीर विक्रीशी संबंधित प्रकरणात कारखान्याची कन्नड येथील 161.30 एकर जमीन, प्लांट आणि यंत्रसामग्री आणि साखर कारखान्याची इमारत इत्यादी जप्त करण्यात आले आहे.

 

भारतीय दंड विधान कलमं आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला. सदर एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या 22.08.2019 च्या आदेशानुसार नोंदविण्यात आला आहे. 

या एफआयआरमध्ये, महाराष्ट्र शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी त्यांच्या नातेवाईक/खासगी व्यक्तींना योग्य प्रक्रियेचे पालन न करता एसएसकेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    follow whatsapp