Sambhaji Nagar Honour Killing : बापानेच पुसलं लेकीचं कुंकू! रस्त्यातच जावयाची हत्या

मुंबई तक

27 Jul 2024 (अपडेटेड: 27 Jul 2024, 06:00 PM)

Honour Killing in Aurangabad Maharashtra : ऑनर किलिंगच्या घटनेने छत्रपती संभाजीनगर शहर हादरले. 14 जुलैच्या रात्री बापाने मुलीच्या पतीची चाकून भोसकून हत्या केली. 

मुलीच्या वडिलांनी जावयाची हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना

point

प्रेमविवाह केला म्हणून मुलीच्या वडिलांनी जावयाची केली हत्या

point

भररस्त्यात घडली ऑनर किलिंगची घटना

Honour Killing News : तथाकथित प्रतिष्ठेपायी बापानेच पोटच्या मुलीचे कुंकू पुसल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे. विरोध असताना मुलीने जातीबाहेर लग्न केल्याच्या रागातून सासऱ्याने जावयाला रस्त्यातच चाकूने भोसकून हत्या केली. 14 जुलै 2024 रोजी घडलेली ही ऑनर किलिंगची घटना तरुणाच्या मृत्यूनंतर समोर आली आहे. या घटनेने शहर आणि राज्यात खळबळ उडाली आहे. (An incident of a father killing a girl husband out of anger for having a love marriage has taken place in Chhatrapati Sambhajinagar city)

हे वाचलं का?

अमित मुरलीधर साळुंके, अशी हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर गीताराम भास्कर कीर्तिशाही (मुलीचे वडील) आणि अप्पासाहेब कीर्तिशाही अशी हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. 

बालपणीचे मित्र, अमित-विद्याचे जडले प्रेम

अमित साळुंके आणि विद्या कीर्तिशाही हे दोघे बालपणीपासून मित्र होते. नंतर दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. दोघे वेगवेगळ्या जातीचे असल्याने कुटुंबियांचा विरोध होता.

हेही वाचा >> महाराष्ट्राला हादरवणारी बातमी... लाखभर महिला बेपत्ता, नेमकं काय घडतंय? 

कुटुंबियाचा विरोध असल्याने अमित आणि विद्या दोघे घरातून पळून गेले. 2 मे 2024 रोजी  विवाह केला. काही दिवस गेल्यानंतर अमितच्या घराच्यांनी दोघांना स्वीकारले आणि ते घरी आले होते.

विद्याचे वडील देत होते धमकी

अमितचे वडील मुरलीधर साळुंखे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, विद्याचे वडील गीताराम कीर्तिशाही हे जिवे मारण्याच्या धमक्या देत होते. गीताराम कीर्तिशाही आणि अप्पासाहेब कीर्तिशाही हे मुरलीधर साळुंखे यांना भेटले होते.

हेही वाचा >> 'भाजपने 288 जागा लढवाव्या', शिंदे-अजितदादासोबतची युती तोडण्याचा राणेंचा सल्ला? 

अमित आणि त्याच्या पत्नीला (विद्या) इंदिरानगरमध्ये राहू देऊ नका. ते जर इथे दिसले तर त्यांच्या जिवाचे बरेवाईट करू, अशी धमकी गीताराम कीर्तिशाही यांनी दिली होती. ते सातत्याने धमकावत होते. 

जेवण करून बाहेर पडला आणि चाकूने भोसकले

14 जुलै 2024 रोजी रात्री 10.15 वाजता अमितने कुटुंबियांसोबत जेवण केले. त्यानंतर तो फिरण्यासाठी घराबाहेर पडला. 10.45 वाजता गीताराम कीर्तिशाही, अप्पासाहेब कीर्तिशाही हे चुलता-पुतण्याने अमितला रस्त्यात गाठले.

हेही वाचा >> भाजप आमदार अडचणीत! हायकोर्टाने पोलिसांना झापले, प्रकरण काय? 

आमच्या मुलीसोबत लग्न करून आमच्यासमोरच राहतो का? असे म्हणत दोघांनी अमितवर अचानक चाकू हल्ला केला. दोघांनीही अमितच्या पोटात, छातीवर आणि हातावर सपासप वार केले. यात तो जागीच पडला. 

11 दिवस सुरू होते उपचार

चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमितला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू होते. 25 जुलै 2024 रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ही घटना समोर आली. या प्रकरणी गीताराम कीर्तिशाही, अप्पासाहेब कीर्तिशाही यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    follow whatsapp