Seema Haider News : गेल्या काही दिवसांपासून देशात एका जोडप्याची खूपच चर्चा होतेय. हे जोडपं कोण याची कल्पना तुम्हाला आली असेल? तर हे आहे नोएडाचा सचिन आणि दुसरी पाकिस्तानमधील सीमा हैदर जोडपं. प्रेमासाठी देशाच्या सीमा ओलांडून आलेल्या सीमा हैदरच्या अनेक कहाण्या आता चर्चिला जात असून, ती सीमा ओलांडून भारतात का आली? हे सगळं खरंच प्रेमात होतं का? प्रेम आंधळं असतं का, आजच्या जगात असं प्रेम खरंच पाहायला मिळतं का? पाकिस्तानातील कराची येथून चार मुलांसह भारतात आलेल्या सीमाने सगळी कथाच सांगितली. (pakistani Seema Haider-sachin love story)
ADVERTISEMENT
सीमा म्हणाली की, सचिनच्या प्रेमामुळेच मी इथे आले, मी तिथे एकटीच राहायचे. सीमाने पती गुलाम हैदरबद्दल सांगितले की, माझे पती जितके चांगले आहेत तितके चांगले नव्हते. अजिबात चांगलं नव्हते. लोकांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये. सीमाने असंही सांगितलं की, लोक म्हणतात की मी इंग्रजी बोलते किंवा मी इतक्या लवकर इथल्या वातावरणात कशी रुळले? पण, मी काही लहान नाहीये. मी 27 वर्षांची आहे आणि मी चार मुलांना जन्म दिला आहे. चांगले काय आणि चूक काय ते मलाही समजते, असे तिने सांगितले.
सीमा हैदर म्हणते, मला खंत नाही
भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध तुला माहिती असेल. दोन्ही देशात कसा तणाव असतो. तरीही चार मुलांसह एका अनोळखी देशात निघून आलीस, हा धोका का पत्करला? या प्रश्नावर सीमा हैदर म्हणाली, धोका पत्करावाच लागला. दोनच मार्ग होते, तिथे राहुन रडण्यापेक्षा इथे येण्यासाठी प्रयत्न करणे.
वाचा >> Seema Haider: प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे ‘हे’ व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का? पतीसोबत…
सीमा म्हणाली की, निदान असं तर नाही ना की मी प्रयत्न केले नाही. नाहीतर सचिनकडे जाण्यासाठी प्रयत्न केला नाही याचा मला आयुष्यभर पश्चाताप झाला असता. मी प्रयत्न केला आणि यशस्वी झाले. मला आधी भारतीय व्हिसा घेऊन यायचे होते, पण तो मिळू शकला नाही, म्हणून मला हा मार्ग पत्करावा लागला, असंही तिने सांगितलं.
सचिन आणि सीमा हैदर प्रेमात कसे पडले?
सचिनने सांगितले की, 2020 मध्ये PubG वर गेम खेळताना नंबर्सची देवाणघेवाण झाली. त्यानंतर हळूहळू गोष्टी घडू लागल्या. PUBG वर फोन कॉलसारखे बोलणे झाले, तर आम्ही त्याच वर बोलायचो. हळूहळू आम्ही एकमेकांकडे आकर्षिले गेलो. मोबाईल नंबरची अदलाबदल केली असता तो पाकिस्तानचा असल्याची माहिती मिळाली. तिथली मुलगी इथल्या परिस्थितीबद्दल काय विचार करत असेल, असं मला वाटायचं. हळूहळू आम्ही बोलू लागलो, मग मला तिचं बोलणं आवडू लागलं. आमचे प्रेम वाढतच गेले. 2021 मध्ये विचार केला की आपण एकमेकांशिवाय राहू शकणार नाही.
पासपोर्ट आणि तिकिटाबद्दल माहिती घेण्यात गेले दीड वर्ष
सीमा हैदरने सांगितले की, त्यावेळी पासपोर्ट कसे बनवले जातात, कुठे बनवले जातात हे मला माहित नव्हते, म्हणून यूट्यूबवर सर्व काही शोधले. पासपोर्ट कसा बनतो? तिकीट कसे काढायचे, कुठे काढायचे याची माहिती घेतली. मी दीड वर्षांपासून याची माहिती घेत होते.
वयाच्या 15 व्या वर्षी झाली आई
गुलाम हैदरशी लग्न करण्याच्या प्रश्नावर सीमा म्हणाली की, ‘माझ्या वडिलांनी हैदरशी लग्न लावून दिले. माझ्या मामांना ते पटत नव्हते. हे लग्न कुणालाही मान्य नव्हते. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी पहिल्या अपत्यासा जन्म दिला. दुसरी मुलगी होती. त्यानंतर तिसरी आणि नंतर मुन्नीच्या जन्माआधी गुलाम हैदर सौदीला गेले. त्यावेळी खूप भांडणं झालं. खूप मारामारी झाली.’
वाचा >> राष्ट्रवादीचा झेंडा न लावल्याने दादांची नाराजी, शिंदेंनी काय उत्तर दिलं?
सीमाने सांगितले की, ‘ती पाकिस्तानात जिथे राहायची ते तेथील लोक याबद्दल सांगू शकतात. गुलामने माझ्या चेहऱ्यावर अनेक वेळा मिरची पावडर फेकलं. ईदचा दिवस होता. दुसरी मुलगी झाली. आमच्यात खूप भांडण व्हायचे, मग माझे वडील भांडण मिटवायचे. तेव्हा मला घटस्फोट घ्यायचा होता. महिनाभर वडिलांच्या घरी राहिले होते. गुलाम हैदर 2019 मध्ये सौदीला गेला, जो अजूनही तिथे आहे.
पाकिस्तानमधून नेपाळमध्ये कसे पोहोचले?
पुढे सीमा म्हणाली, ‘नेपाळमध्ये पहिल्यांदा भेटलो. तिथे जाण्यासाठी ट्रॅव्हल एजंटमार्फत तिकीट काढले होते.’ सोशल मीडियावर अनेक लोक फसवणूक करतात, असे विचारले असता, तुम्हाला PubG च्या माध्यमातून भेटल्यानंतर तुम्हाला असे वाटले नाही का की तुम्ही एका अनोळखी मुलाला भेटणार आहात, ज्याला तुम्ही पाहिले नाही, जो भारतातील आहे, फसवणूक होऊ शकते?
या प्रश्नावर सीमा म्हणाली की, ‘मी घाबरले नाही. माझा खूप विश्वास होता आणि मी स्वतःला खूप मजबूत समजते. काहीही झाले तरी जोपर्यंत व्यक्ती स्वतः चूक करत नाही, तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही.’ सीमाने सांगितले की, ‘आपण सचिनला यापूर्वी भेटलो होतो, तो नेपाळलाही आला होता. मी पण आले. आम्ही सात दिवस एकत्र राहिलो, हिंडलो, लग्न झाले. मस्त एन्जॉय केला. हॉटेलमध्ये खाणेपिणे होते. त्यानंतर मी मुलांकडे परत गेले.’
‘नेपाळमध्ये लग्न, पशुपतीनाथ मंदिराला भेट दिली’
‘मी एक दिवस आधी तिथे पोहोचले होते. काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर सचिनची वाट पाहत होते. सचिनला पाहताच तिथे ओळखले होते. फोनवर बोलत होते की तू कुठे आहेस, मी इथे आहे. ब्रीफकेस पाहिली होती’, असं सीमाने सांगितलं.
तुम्ही पहिल्यांदा समोरासमोर भेटलात तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? काय भावना होत्या? या प्रश्नाच्या उत्तरात सीमाने सांगितले की, ‘आम्ही आनंदी आहोत. तेथे सात दिवस राहिलो. मुलं एकटीच होती, त्यामुळे सात दिवसांचे तिकीट काढून मी काठमांडूला पोहोचले. आम्ही व्हिडिओ कॉलवर बोलायचो. मी माझ्या बहिणीला सांगितले की फिरायला जात आहे.’ सीमाने सांगितले की, ‘मी सचिनशी नेपाळमध्ये लग्न केले. तेथील पशुपतीनाथ मंदिरात गेलो.’
ADVERTISEMENT
