Crime : मुलीनेच दिली आईच्या हत्येची सुपारी; प्रियकराच्या मदतीने घोटला गळा

मुंबई तक

• 10:38 AM • 03 Apr 2023

14 वर्षीय मुलीने 15 वर्षांच्या प्रियकरासोबतच रचला आईच्या हत्येचा डाव, तब्बल 3 लाखांची सुपारी देऊन घेतला जीव…

14-year-old teenager, along with a 15-year-old friend, has been accused of killing her mother

14-year-old teenager, along with a 15-year-old friend, has been accused of killing her mother

follow google news

Crime News :

हे वाचलं का?

एका मुलीने स्वतःच्याच आईची सुपारी देऊन हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अनास्तासिया असं मृत आईचं नाव आहे. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे सुपारी देणाऱ्या मुलीचे वय अवघे 14 वर्ष आहे आणि तिने तिच्या 15 वर्षीय प्रियकरलाच या हत्येची सुपारी दिली होती. रशियाच्या मॉस्कोमधून ही बातमी समोर आली आहे. (14-year-old teenager, along with a 15-year-old friend, has been accused of killing her mother)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा या मुलीच्या कुटुंबासोबतच राहत होता. काही दिवसांतच आईला संबंधित मुलाच्या वाईट सवयींबाबत माहिती समजली. यानंतर मुलगीला वाईट संगत लागत असल्याचं सांगून आईनं मुलाला घराबाहेर काढलं आणि मुलीलाही संबंधित मुलापासून लांब राहण्याची तंबी दिली. यानंतर संतापलेल्या मुलीने प्रियकराच्या मदतीने हत्येचा डाव रचला. तिने तिच्या प्रियकराला 3 हजार 650 पौंडची (3 लाख 71 हजार रुपये) सुपारी दिली होती, त्यानंतर संबंधित प्रियकराने आणखी एका मुलाला सोबत घेऊन मुलीच्या आईची हत्या केली. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपी 14 ते 17 वयोगटातील आहेत. सध्या हे सर्वजण एक महिना बालसुधारगृहात राहणार असून त्यांची चौकशी सुरू आहे, असंही पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा : Crime News : आई शप्पथ! अंपायरने दिला ‘नो बॉल’, त्याने चाकूने भोकसले; मैदानावर घडला थरार; मैदानावर घडला थरार

दोन दिवसांनंतर प्रकार आला समोर :

दरम्यान, हत्येच्या 2 दिवसांनंतर मॉस्को प्रांतातील बालशिखा शहरातील कचराकुंडीत संबंधित महिलेचा मृतदेह प्लास्टिकमध्ये आणि गादीमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला. एका स्थानिक चौकीदाराने मृतदेह डस्टबिनमध्ये पडलेला पाहिल्यानंतर त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार “मृत महिलेला मारहाण करण्यात आली होती आणि तिचा गळा दाबला गेला होता, तिचा संपूर्ण चेहरा लाल आणि सुजलेला होता.

हेही वाचा : पती झोपलेला.. बायको घरात परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत; झोपेतून उठताच…

आईच्या पैशांवर मजा मारायचा होता प्लॅन :

मिळालेल्या माहितीनुसार, आईने आतापर्यंत साठवलेल्या 30 हजार पौंड (30 लाख 51 हजार रुपये) रक्कमेवर मुलीचा आणि मुलाचा डोळा होता. याच पैशांवर मजा मारायचा दोघांचाही प्लॅन होता. मुलीच्या एका मित्राने पोलिसांना सांगितले की, “तिच्या बोलण्यात सतत आईबद्दलचा तिरस्कार असायचा. पण तिची आई एक चांगली व्यक्ती होती. आणि ती त्याच्यावर प्रेम करायची. मुलीची काळजी घेत होती आणि तिच्या भविष्यासाठी नेहमीच चांगले करण्याचा प्रयत्न करत होती. तर आरोपी मुलीच्या आजीने सांगितले की, तिची नात एका वाईट मुलाच्या संगतीत आली होती.

    follow whatsapp