नागपुरात (Nagpur) एका तरूणाने फेसबूक लाईव्ह करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मनीष रामपाल यादव असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. मनीष यादवने फेसबूक लाईव्ह करून कन्हान नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. नागपुरच्या कामठी पोलीस ठाणे हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सध्या शहर हादरले आहे. य़ा घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) या घटनेचा तपास सूरू केला आहे.या तपासात पोलिसांच्या हाती मनीषचा एक मोबाईल आणि व्हिडिओ क्लिप लागली आहे. या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून या आत्महत्याप्रकरणाचा उलगडा होणार आहे. (a boy jumping river and commit suicide nagpur crime story)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरच्या मिनीमाता नगर परिसरात मनीष यादव राहायचा. मनीष यादवचे इलेक्ट्रिकचे दुकान होते, जे तो स्वत:च चालवायचा.रविवारी सकाळी 10 च्या सुमारास मनीष घरातून टू व्हिलर घेऊन निघाला. संध्याकाळी त्याने मोबाईलमध्ये एक व्हिडिओ बनवला आणि त्यांच्यासोबत घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती त्याने या व्हिडिओत दिली. या व्हिडिओनंतर मनीषने फेसबूक लाईव्ह देखील केले,यामध्ये त्याने त्याच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला.या सर्व घटनेनंतर मनीषने मोबाईल डिक्कीमध्ये ठेऊन दिला आणि कन्हान नदीच्या दिशेने जात उडी घेऊन आत्महत्या केली.
हे ही वाचा : Maratha Reservation : मनोज जरांगे पाच अटींवर सोडणार उपोषण, शिंदे सरकार काय करणार?
दरम्यान रात्र झाली तरी मनीष घरी परतला नसल्याने कुटुंबियांना त्याची काळजी वाटत होती, त्यामुळे कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी मनीषचा तपास सुरू केला. या दरम्यान सोमवारी 11 सप्टेंबरला कन्हान नदीत मनीषचा मृतदेह आढळून आला. या तपासात मनीषची टू व्हिलर कन्हान नदीच्या जवळ दिसून आली. यावेळी पोलिसांनी गाडीची डिक्की उघडून तपास केला असता, त्यामध्ये मनीषचा मोबाईल आढळून आला. या मोबाईलमध्ये मनीषची एक व्हिडिओ क्लिप आढळून आली होती. या व्हिडिओ क्लिपमधून आता मनीषच्या आत्महत्येचे कारण समोर आले होते.
मनीष यादवच्या संपर्कात एक तरूणी आली होती. या तरूणीने मनीषला आपल्या जाळ्यात फासले होते. त्यानंतर या तरूणीने आपल्या मित्रासोबत मिळून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी मनीषला दिली होती. पण जर ही तक्रार दाखल करायची नसेल तर पाच लाख रूपये दे,अशी मागणी तरूणीने मनीषकडे केली होती. तरूणीच्या या धमकीला घाबरून मनीषने पैसा गोळा करायला सुरुवात केली होती. परंतू या रक्कमेची जमवाजमवच त्याला करता आली नव्हती. यामुळे मनीष यादव मानसिक तणावात होता. याच तणावातून आता मनीष यादवने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे.
हे ही वाचा : Maratha Reservation : संजय राऊत संतापले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
दरम्यान पोलीस या प्रकरणात आता आरोपी तरूणी आणि तिच्या साथीदाराचा शोध घेत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT