Ahmednagar Crime News : अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील बनवला आहे. अहमदनगरच्या पिंपलगावमधील लांडगा गावात ही घटना घडली आहे. या घटनेने सध्या अहमदनगर हादरलं आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपी नवऱ्याला अटक केली आहे. (ahmednagar crime news husband burn her wife and two daughter shocking crime story)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या पिंपलगाव येथील लांडगा गावात लांडगे कुटुंब राहते. या घटनेतील आरोपी नवऱ्याचे लग्न झाले होते. या लग्नापासून त्याला दोन मुली होत्या. या दरम्यान आज सकाळी नवऱ्याने घरातच बायको आणि दोन मुलींवर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत पेटवले होते. त्यानंतर कुटुंबियांना शेजारच्यांनी वाचवू नये यासाठी आरोपीने घराला टाळे देखील ठोकले होते. मात्र आरोपीने क्रुरतेचा कळस तेव्हा गाठला जेव्हा त्याने कुटुंबियांतील सदस्यांना जाळतानाचा संपूर्ण व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओत 'सुनील काय चीज आहे, तुला आता कळेल?' असे आरोपी बोलताना दिसला आहे.
हे ही वाचा : Sharmila Pawar : ''मुखातून श्रीराम म्हणतोय, घरात महाभारत चाललंय''
दरम्यान लांडगेंच्या घरातून येत असलेला धुर पाहून शेजारच्यांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली होती. मात्र घराला कुलूप असल्याने त्यांना वाचवता आले नाही. त्यामुळे आगीत होरपळून बायकोसह 13 वर्षाची मुलगी आणि 10 महिन्याच्या मुलीचा अंत झाला होता.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे पीआय प्रल्हाद गिते घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी अग्निशमन दलाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर अग्नीशामन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सुनील लांडगे याला अटक केली आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
हे ही वाचा : Lok Sabha Elections 2024 : उमेदवारी मिळताच धानोरकरांनी मुनगंटीवारावर चढवला हल्ला
या प्रकरणात आरोपी सुनील लांडगे याला पत्नीचे अनैंतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून आरोपीने दारूच्या नशेत अख्खं कुटुंब जिंवत जाळलं होतं. या घटनेने सध्या अहमदनगर हादरलं आहे. या प्रकरणी पोलीस सुनील लांडगे यांची चौकशी करत असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT