भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सहारनपूरच्या देवबंद येथे चंद्रशेखर आझाद यांच्या वाहनांच्या ताफ्यावर अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या अंदाधुंद गोळीबारात सुदैवाने चंद्रशेखर आझाद बचावले आहेत. मात्र या गोळीबारात एक गोळी त्यांच्या शरीराला चाटून गेली आहे, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे चंद्रशेखर आझाद यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आझाद यांच्या गाडीच्या सीटवर आणि कारवर झाडलेल्या गोळ्या पाहता या गोळीबाराची भीषणता लक्षात येईल.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठुन तपास सुरु केला आहे.(bhim army cheif chandrashekhar azad firing on deoband saharanpur)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी चंद्रशेखऱ आझाद यांच्या कारवर अदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारातील एक गोळी चंद्रशेखर आझाद यांच्या शरीराला चाटुन गेली होती. त्यामुळे ते गंभीररीत्या जखमी झाले होते. सध्या त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेत अज्ञात हल्लेखोरांनी इतका अंदाधुंद गोळीबार केला होता की, आझाद यांच्या कारच्या काचाच फुटल्या होत्या. तर काही गोळ्या या सीटच्या आत आणि कारच्या दरवाजाच्या आत घुसल्या होत्या. सुदैवाने या भीषण हल्ल्यात चंद्रशेखर आझाद बचावले आहेत.
हे ही वाचा : ‘बीआरएसचा फटका ‘मविआ’लाच बसणार’, सुनील तटकरेंनी मतदारसंघातीलच दिलं उदाहरण
अज्ञात हल्लेखोरांनी इतका अंदाधुंद गोळीबार केला होता की, आझाद यांच्या कारच्या काचाच फुटल्या होत्या. तर काही गोळ्या या सीटच्या आत आणि कारच्या दरवाजाच्या आत घुसल्या होत्या. सुदैवाने या भीषण हल्ल्यात चंद्रशेखर आझाद बचावले आहेत.या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली आहे.यासोबत पोलिसानी त्वरीत घटनास्थळी नाकाबंदी करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. तसेच घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. जेणेकरून अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेता येईल.
शरीराला चाटुन गेली गोळी
चंद्रशेखर दिल्लीवरून आपल्या घरी परतत असताना देवबंद नजीक त्यांच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. यावेळी हल्लेखोरांनी वाहनावर चार राऊंड फायर केले होते. यातील एका गोळीने गाडीच्या काचा फुटल्या होत्या, तर गोळी सीट भेदून गेली होती, तर तिसऱी गोळी गाडीच्या दरावाजावर लागली होती. तर एक गोळी आझाद यांच्या शरीराला चाटून गेली होती.
हे ही वाचा : Pasmanda Muslim: ‘या’ मुस्लिम मतांवर BJP चा डोळा का? PM मोदींची रणनीती नेमकी काय?
दरम्यान ज्या गाडीतून हल्लेखोर आले होते,ती गाडी हरीयाणा राज्यातील नंबरची असल्याची माहिती आहे. तसेच हल्लेखोरांची गाडी ही सफेद रंगाची स्विफ्ट डिजायर होती. या गाडीचा आता पोलीस शोध घेत आहे.अर्धा तासापूर्वी चंद्रशेखर आझाद यांच्या वाहनाच्या ताफ्यावर कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुद गोळीबार केला. या गोळीबारातील एक गोळी आझाद यांच्या शरीराला चाटुन गेली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठिक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहे, अशी माहिती एसएसपी डॉ. विपिन ताडा यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT