Murder Case: नोएडा पोलिसांनी (Noida Police) ग्रेटर नोएडाजवळील हिंडन नदीत चार दिवसांपूर्वी सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटवली असून त्या हत्येमागचं कारण स्पष्ट केले आहे. मृत विपिनच्या मेहुण्यानेच त्याच्या मित्रासोबत मिळून आपल्या मेव्हण्याची हत्या (Murder) केली होती. मेव्हण्याचे पत्नीशी अनैतिक संबंध (Immoral relationship) असल्याचा संशय त्याला आला होता. पोलिसांनी या हत्येप्रकरणी आरोपी मेव्हणा जॉनी आणि त्याचा मित्र श्यामवीर यांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
एकाच घरातील भाडोत्री
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अलिगडमध्ये राहणारा विपिन हा नोएडामधील एका कंपनीमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून काम करत होता.
नोएडामधील नगला चरणदासमध्ये गावामध्ये खोली भाडोत्री घेऊन राहत होता. तर विपिनची चुलत बहीणही त्याच घरातील दुसऱ्या खोलीत राहत होती. त्याच्या बहिणीचा नवरा जॉनी हा अहमदगडमधून नोकरीसाठी आला होता.
पॅनकार्डवरून पटली ओळख
पोलिसांनी सांगितले की, विपिन हा 10 जानेवारी रोजी ड्युटीवर गेला होता, मात्र रात्र झाली तरी तो घरी परतला नव्हता. त्यानंतर 12 जानेवारी रोजी हिंडन नदीमध्ये विपिनचा मृतदेहच पोलिसांना सापडला होता. त्याचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या खिशात सापडलेल्या पॅन कार्डवरून त्याच्या मृतदेहाची ओळख पटली आहे.
हे ही वाचा >>Shiv Sena UBT: ‘राहुल नार्वेकरांची बायकोही ‘तो’ निर्णय…’, संजय राऊतांची तोफ धडाडली
पैशाचं दाखवलं आमिष
पोलिसांनी या हत्येचा तपास करताना सांगितले की, या प्रकरणी विपिनच्या मेहुण्याला आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. मेहुणा जॉनीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सांगितले की, विपिनचे आणि त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्या संशयातूनच त्याने विपिनच्या हत्येचा कट रचला होता. त्याची हत्या करण्यासाठी जॉनीने त्याचा मित्र श्यामवीरची मदत घेऊन त्याला ठार करण्यात आले होते. यावेळी श्यामवीरला पैशाचेही आमिष दाखवून त्याला या कटात त्याने सामील करून घेतले होते.
हत्याही केली अन् पैसे काढले
विपिनची हत्या करताना जॉनी आणि श्यामवीरने त्याला आधी त्यानी दारू पाजली होती. त्यानंतर त्यांनी त्याची दोरीने गळा आवळून आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केली. त्याची हत्या करुन झाल्यानंतर मोबाईलच्या साहाय्याने 8475 रुपये त्या दोघांनी ऑनलाईन पैसेही घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून मृताचे चार हजार रुपये ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी तपासानंतर हत्येचं हे कारण सांगितलं असलं तरी त्याच्या कुटुंबीयांनी मात्र त्याची हत्या पैशासाठी केल्याचा आरोपही केला आहे.
ADVERTISEMENT