Crime: मित्रांसोबत पार्टीला गेली अन् हॉटेलमध्येच…, IIT च्या विद्यार्थीनीसोबत काय घडलं?

प्रशांत गोमाणे

• 02:41 PM • 03 Jan 2024

ऐश्वर्या पुल्लुरी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागात चौथ्या वर्षाची बी.टेकची विद्यार्थिनी होती. न्यु ईयरचे सेलिब्रेशन करण्यासाठी ती क़ॉलेजपासून 25 किलोमीटर दुर परिसरात गेली होती.

crime news guwahati btech fourth year female student found dead in telengana hotel shocking crime story

crime news guwahati btech fourth year female student found dead in telengana hotel shocking crime story

follow google news

Crime News : तेलंगणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत न्यु ईयर पार्टीला गेलेल्या एका तरूणीचा हॉटेलमध्ये मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. ऐश्वर्या पुल्लुरी असे या तरूणीचे नाव आहे. ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गुवाहाटी येथे चौथ्या वर्षाचा बी.टेकचे शिक्षण घेत होती. तिचा मृतदेह आढळल्याने आता तिच्या मित्रांसह कुटुंबियांना धक्का बसला आहे.या प्रकरणात आता तिचा मृत्यू झाला आहे की तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत. (crime news guwahati btech fourth year female student found dead in telengana hotel shocking crime story)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या पुल्लुरी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागात चौथ्या वर्षाची बी.टेकची विद्यार्थिनी होती. न्यु ईयरचे सेलिब्रेशन करण्यासाठी ती क़ॉलेजपासून 25 किलोमीटर दुर परिसरात गेली होती. या परिसरात गेल्यावर त्यांनी एका हॉटेलमध्ये रूम बुक केला होता. यावेळी तिच्यासोबत हॉटेलमध्ये तिची एक मैत्रिण आणि दोन मुले देखील होती.

हे ही वाचा : Aditya Thackeray : ‘युवराज म्हणजे तळ्या काठी खोटे ध्यान…’ आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या आणि तिच्या मित्रांनी ऑनलाईन पद्धतीने हॉटेलचे रूम बूक केले होते.त्यानंतर अर्ध्या रात्री ते चेक ईनसाठी हॉटेलवप पोहोचले होते. यावेळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये आलेल्या या तरूणी नशेत होत्या. दरम्यान हॉटेलमध्ये आल्यानंतर ते चौघे ही आपआपल्या रूममध्ये झोपायला गेले होते. चौघेही नशेत असल्याने कुणालाच काहीच कळत नव्हते.

दरम्यान सकाळी उठल्यावर एक जण बाथरूममध्ये गेला असता त्याला ऐश्वर्याचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने तिच्या मित्रांना चांगलाच धक्का बसला. ऐश्वर्याच्या मित्रांनी या घटनेनंतर हॉटेल कर्मचाऱ्यांना माहिती देत पोलिसांनी देखील सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केला होता. पोलिसांनी यावेळी ऐश्वर्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवला आहे.

हे ही वाचा : Ram Mandir: प्रभू रामाची मूर्ती खरंच अशी असणार… व्हायरल फोटो मागचं सत्य काय?

दरम्यान प्राथमिक माहितीनुसार, तरूणीच्या शरीरावर जखमेची एकही खुण आढळली नाही आहे.तसेच तिचा मृत्यू कसा झालाय, याची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे तिचा नेमका मृत्यू कसा झालाय, हे आता पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. तसेच या प्रकरणात हत्येचा संशय़ व्यक्त होतोय.

पोलिसांनी या प्रकरणात ऐश्वर्याच्या मित्रांची चौकशी केली आहे. या चौकशीतून आता पोलिसांच्या हाती तपासाचे काय धागे दोरे लागतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

    follow whatsapp