Ujjain Rape : बलात्कार झाला… रक्ताने माखलेलं तिला पाहून पत्नीला बोलवायला गेला अन्..

रोहिणी ठोंबरे

28 Sep 2023 (अपडेटेड: 28 Sep 2023, 10:27 AM)

मध्य प्रदेशमध्ये भोलेनाथाच्या प्रसिद्ध महाकाल नगरीत माणुसकीला काळीमा फासणारा एक क्रूर प्रसंग घडला आहे. उज्जैनसारख्या धार्मिक ठिकाणी घडलेल्या पीडित मुलीवरील बलात्कार प्रकरणाने संपूर्ण भारताला अस्वस्थ केलं आहे. या पीडित अल्पवयीन मुलीचं वय 12 वर्ष आहे.

Mumbaitak
follow google news

Ujjain Rape Case : मध्य प्रदेशमध्ये भोलेनाथाच्या प्रसिद्ध महाकाल नगरीत माणुसकीला काळीमा फासणारी एक क्रूर घटना घडली आहे. उज्जैनसारख्या धार्मिक ठिकाणी घडलेल्या पीडित मुलीवरील बलात्कार प्रकरणाने संपूर्ण भारताला अस्वस्थ केलं आहे. या पीडित अल्पवयीन मुलीचं वय 12 वर्ष आहे. आता पीडितेला पहिल्यांदा भेटलेल्या व्यक्तींनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या राजेशला, पहिल्यांदा ही पीडिता अल्पवयीन मुलगी रक्ताने माखलेली, अर्धनग्न अवस्थेत दिसली होती. (Crime Story Ujjain Rape Case eyewitness statements)

हे वाचलं का?

शहरातील तिरुपती ड्रीम्स कॉलनीत राहणारा राजेश म्हणाला की, “मी एक शेतकरी आहे आणि दररोज पहाटे साडेपाच वाजता उठतो. मंगळवारी (26 सप्टेंबर) सकाळी मला जाग येताच घराचे गेट उघडले असता समोरून अर्धनग्न मुलगी रडताना दिसली. मी तिला विचारले काय झाले बेटा? तिने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. पण मला तिची भाषा समजत नव्हती.

छगन भुजबळ शरद पवारांना तुरुंगातून करायचे ब्लॅकमेल; रमेश कदमांनी टाकला ‘बॉम्ब’

मी लगेच आत जाऊन पत्नीला उठवलं आणि सांगितलं की एक मुलगी अर्धनग्न अवस्थेत बाहेर फिरत आहे. तू बाहेर चल. मात्र, आम्ही दोघंही घरातून बाहेर आलो तोपर्यंत मुलगी तिथून निघून गेली होती. ती कोणत्या मार्गाने गेली? कुठे गेली? याबद्दल काहीही माहिती नाही. खरं तर मला एका कार्यक्रमासाठी नलखेडा येथे जायचं होतं म्हणूनच मी मोटारसायकलवरून उज्जैनला निघालो.’

पीडितेला मदत करणारा दुसरा व्यक्ती काय म्हणाला?

आणखी एक मदत करणारे प्रत्यक्षदर्शी, आचार्य राहुल शर्मा म्हणाले, “काही आपत्कालीन परिस्थितीमुळे मला गुरुकुलाबाहेर जावे लागले. या वेळी एक अस्वस्थ मुलगी या वाटेने बडनगर भागाच्या दिशेने जात असल्याचे मला दिसले. मी पाहिले की मुलगी अर्धनग्न होती. ती अंग झाकण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला लगेच माझ्याकडचा कपडा दिला. ज्याने तिने आपले शरीर झाकले आणि नंतर माझ्या आश्रमात नाश्ता केला.

मी पीडितेला विचारले, तुला भूक लागली आहे का? तिने मला होकार दिला. मी तिला आश्रमातून नाश्ता आणि चहा दिला. मी तिला पुन्हा-पुन्हा तिचं नाव विचारण्याचा प्रयत्न केला , तुझे नाव काय आहे? कुठून आलीस? उज्जैनमध्ये कधीपासून आहेस? पालकांचा नंबर आठवत असेल तर मला सांग. इथे तू पूर्णपणे सुरक्षित आहेस. कोणत्याही प्रकारची भीती नाही. मी तिला पुन्हा पुन्हा धीर दिला.

Viral Video : लोकलमध्ये घडले Slap War, कॉलर पकडत एकमेकांची कानशिलं केली लाल…

10-20 मिनिट ती मला काहीच बोलू शकली नाही. ती काहीतरी बोलत होती. कदाचित मला तिची भाषा कळत नव्हती. मी तिला एक पेन आणि एक पेपरही दिली आणि त्यावर काहीतरी लिहायला सांगितले. तिला काहीच लिहिता येत नव्हते तेव्हा मी लगेच 100 नंबर डायल केला.

माझा कॉल दोन ते तीन वेळा डिस्कनेक्ट झाला. त्यानंतर मी महाकाल मंदिरातील काही प्रशासकीय लोकांना बोलावले. त्यांनी मला महाकाल पोलीस स्टेशनचे नंबर दिले. मी तिथे तक्रार नोंदवली. त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. मुलीला सुरक्षित हाती लागावे म्हणून मी तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. मला कुठेतरी इमर्जन्सी मीटिंगला जायचं होतं. मात्र असे असतानाही मी माझे सर्व काम पुढे ढकलले आणि माझ्या डोळ्यासमोर पीडितेला पोलिसांच्या स्वाधीन केले.

उज्जैनमधील 12 वर्षांच्या या पीडित मुलीवर बलात्कार करून तिला रस्त्यावर फेकल्याची ही खळबळजनक घटना आहे. जिथून ती अर्धनग्न अवस्थेत इकडे तिकडे फिरताना दिसली. मुलीची प्रकृती नाजूक झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करून इंदूरला पाठवण्यात आलं. जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

भारताच्या हरितक्रांतीचे जनक स्वामीनाथन यांचे निधन, रॅमन मॅगसेसेने झाला होता गौरव

उपचारादरम्यान पोलिसांनी पीडितेला रक्तही दिले. उज्जैनचे पोलीस अधीक्षक सचिन शर्मा म्हणाले की, ‘दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यात घडलेल्या घटनेबाबत आम्ही एफआयआर दाखल केला होता. एसआयटी स्थापन करण्यात आली असून सर्व बाबींचा तपास सुरू आहे. एका संशयिताचीही चौकशी सुरू होती. याचे पुरावेही समोर आले. पूर्ण पुरावे मिळेपर्यंत आमचा तपास सुरू राहील. काही पुरावे मिळाले असून त्याआधारे आम्ही पुढील कारवाई करत आहोत. ही पडताळणी केवळ वैद्यकीय अहवालाच्या आधारे केली जाते. वैद्यकीय अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.’

    follow whatsapp