Abhishek Ghosalkar Murder Case: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील (Shivsena UBT) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दहिसरमधील या धक्कादायक प्रकरणानंतर राजकीय वर्तुळासह सामान्य लोकांमध्येही खळबळ उडाली आहे. फेसबुक लाईव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्यावर त्यांच्याचसोबत बसलेल्या मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने गोळी झाडल्या. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. (Dahisar Firing Case In Abhishek Ghosalkar Murder Case two people mehul parikh and rohit sahu in Mumbai police custody)
ADVERTISEMENT
या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मेहुल पारेख आणि रोहित साहू अशी या दोघांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे फेसबुकवर लाईव्ह होते त्यावेळी मेहुल पारेख देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची देखील शक्यता आहे.
मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या घोसाळकर यांना लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसंच या प्रकरणी सखोल तपास मुंबई पोलीस करत आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेला मेहुल पारेख हा आरोपी मॉरिस नोरोन्हाचा पीए होता. त्याच्यासह रोहित साहू नावाच्या आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं, हत्या करण्याचे कारण काय?, घोसाळकर आणि मॉरिसमध्ये नेमका कोणता वाद होता? या सर्वाची चौकशी मुंबई पोलीस करतील.
ADVERTISEMENT