Crime : डेटिंग अ‍ॅपवर मैत्री, गोड बोलून फ्लॅटवर नेलं; तरूणाने…

प्रशांत गोमाणे

27 Oct 2023 (अपडेटेड: 27 Oct 2023, 10:30 AM)

डेटिंग अ‍ॅपची मैत्री एका तरूणीला चांगलच महागात पडलं आहे. कारण तरूणीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना घडली आहे. या घटनेने घाबरलेल्या पीडितेने कुटुंबियांना हा संपूर्ण प्रसंग सांगितला.

dating app friendship boy forcefully try to physical relation with girl Shocking crime story from delhi

dating app friendship boy forcefully try to physical relation with girl Shocking crime story from delhi

follow google news

Delhi Crime : डेटिंग अ‍ॅपवर (Dating App) मैत्री, भेटायला बोलावलं अन् अनर्थ, तरूणीसोबत काय घडलं? सध्याच्या काळात जर एखाद्या तरूणाला एखाद्या तरूणीला डेट करायचं असेल, तर सहजासहजी डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून डेट करता येते. यासाठी अनेक अ‍ॅप सध्या कार्यान्वित आहेत. मात्र अशाप्रकारे डेट करण एका तरूणीला चांगलच महागात पडलं आहे. कारण तरूणीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना घडली आहे. या घटनेने घाबरलेल्या पीडितेने कुटुंबियांना हा संपूर्ण प्रसंग सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस (Police) ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर आरोपी तरूणाचा शोध घेतला जात आहे. (dating app friendship boy forcefully try to physical relation with girl Shocking crime story from delhi)

हे वाचलं का?

राजधानी दिल्लीत (Delhi) ही घटना घडली आहे. या घटनेत पीडीत तरूणीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, 17 जानेवारी 2023 माझी डेटिंग अ‍ॅपवर एका तरूणाशी मैत्री झाली होती. या मैत्रीनंतर दोघांमध्ये संवाद वाढत चालला होता. या वाढत्या संवादानंतर तरूणाने पीडितेला भेटायची मागणी केली. सुरुवातीला पीडितेने नकार दिला. मात्र तरीही देखील तरूण भेटीवर अडूनच राहायला. दरम्यान तरूणाच्या सततच्या भेटीच्या मागणीनंतर अखेर 18 जानेवारी 2023 पुन्हा एकदा त्याने पीडितेवर भेटीसाठी दबाव टाकला. आरोपी तरूणाने पीडितेला एका चहाच्या दुकानावर भेटायला बोलावले. यावेळी पीडितेने तरूणाला भेटण्यासाठी होकार दिला. मात्र पीडित तरूणी चहाच्या दुकानापर्यंत पोहोचेपर्यंत खूपच उशीर झाला होता.

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘मराठ्यांची पोरं मोठी होऊ नयेत म्हणून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं षडयंत्र’- मनोज जरांगे पाटील

त्यामुळे आरोपी तरूण पीडीतेला मध्यरात्री 3 वाजता दिल्लीच्या बसंत नगर भागातील रूमवर घेऊन गेला. आरोपीने पीडितेला घरी नेताच तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने पहाटे घटनास्थळावरून पळ काढला. घरी पोहोचल्यानंतर पीडितेने कुटुंबियांना या घटनेची संपूर्ण माहिती दिली. यानंतर कुटुंबियांनी गुलाबी बाग पोलीस ठाणे गाठत आरोपी नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कलम 376अंतर्गत आरोपी नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलीस यांनी या प्रकरणात आता आरोपी तरूणाचा शोध घ्यायला सुरूवात केली आहे. या घटनेने सध्या दिल्लीत खळबळ उडाली आहे.

    follow whatsapp