बालहट्टाने चिडला, पोटच्या पोरीला जीव जाईपर्यंत जमिनीवर आपटत राहिला बाप

मुंबई तक

07 Jun 2023 (अपडेटेड: 07 Jun 2023, 09:53 AM)

निष्पाप मुलीने (Daughter) बापासमोर (Father) केवळ खेळणीचा हट्ट धरला होता. चिमुकलीच्या या हट्टापायी रागावत बापानेच मुलीची हत्या केली आहे. नशेत असताना बापाच्या हातून ही संपूर्ण घटना घडली आहे. राकेश (45) असे या आरोपी बापाचे नाव आहे.

daughter insisted taking toy irritate father killed indore crime story

daughter insisted taking toy irritate father killed indore crime story

follow google news

देशभरात लहान मुलांच्या हत्येच्या आणि मृत्यूच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका बापानेच पोटच्या पोरीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. निष्पाप मुलीने (Daughter) बापासमोर (Father) केवळ खेळणीचा हट्ट धरला होता. चिमुकलीच्या या हट्टापायी रागावत बापानेच मुलीची हत्या केली आहे. नशेत असताना बापाच्या हातून ही संपूर्ण घटना घडली आहे. राकेश (45) असे या आरोपी बापाचे नाव आहे. विशेष म्हणजे बापाने मुलीच्या केलेल्या हत्येवर त्याला अजिबात पछतावा होत नाही. त्यामुळे या घटनेनंतर आता संताप व्यक्त होतोय. (daughter insisted taking toy irritate father killed indore crime story)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनूसार, द्वारीकापूरी पोलीस (Police) ठाणे हद्दीतील ऋषी पॅलेसमध्ये राहणारा आरोपी बाप (Daughter) राकेश (45) नशेत असताना घरी पोहोचला होता. बापाला घरी आल्याचे पाहून मुलीने त्याच्याकडे खेळण्यासाठी हट्ट धरला होता. मुलीच्या या हट्टाला संतापून बापाने तिच्याशी मारझोड सुरु केली होती. त्यानंतर मुलीला दुकानातून कोल्डड्रिंक देण्याच्या बहाण्याने घराबाहेर घेऊन गेला. त्यानंतर घराबाहेर एका ठिकाणी आरोपी बापाने मुलीचे डोक आपटून तिची हत्या केली. या दरम्यान मुलीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी जीवाचा आकांत करत ओरड दिली होती. मात्र नशेबाज पित्याला तिच्यावर दया आली नाही.आणि आरोपी पिता तिचा मृत्यू घेऊनच मानला.

हे ही वाचा : Mumbai : “ती म्हणायची सुरक्षारक्षकाची भीती वाटते”, ‘त्या’ तरुणीने वडिलांना काय सांगितलं होतं?

या संपूर्ण घटनाक्रमानंतर वडिलांनी मुलीच्या मृतदेहाला खांद्यावर घेऊन लपून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रस्त्यावर असलेल्या नागरीकांना या घटनेची माहिती मिळाली होती. विशेष म्हणजे आरोपी वडिल इतका नशेत होता की, त्याने मुलीची हत्या केली आहे, याची त्याला माहिती देखील नव्हती. स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर आरोपी वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

आरोपी पित्याचा नशा उतरल्यानंतर त्याने या घटनेबाबत धक्कादायक खुलासा केला. बायको 3 वर्षापुर्वीच सोडून गेली. मोलमजूरी करून मी घर चालवतो. मुलगी संध्याने वडिल राकेश यांना घरी आल्याचे पाहून त्यांच्याकडे खेळण्याचा हट्ट केला. संध्या तिच्या इतर मित्र-मैत्रीणींकडे पाहून तिने वडिलांसमोर हटट् केला होता. या तिच्या हट्टाची वडिलांना फार चीड यायची. मुलीच्या याच हट्टाला रागवून तिचा आवाज बंद करण्यासाठी वडिलांनी तिची हत्या केली. मुलीची हत्या केल्याचा त्याला अजिबात पछतावा होत नसल्याचा खुलासा आता त्याने पोलिसांसमोर केला आहे.

या प्रकरणात आता पोलिसांनी वडिल राकेश यांना अटक करून त्यांना कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्यांना मुलीच्या हत्येप्रकरणी पोलीस कोठड़ी सुनावली आहे. इंदुरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने आता शहर हादरले आहे.

    follow whatsapp