Dombivali Crime : दगडाने ठेचलं डोकं, मित्रांनीच संपवलं; हत्येचे कारण तपासातून आलं समोर

प्रशांत गोमाणे

29 Nov 2023 (अपडेटेड: 29 Nov 2023, 11:12 AM)

डोंबिवलीतील तरूणांचा एक ग्रुप दारू पार्टी करायला गेला होता. ही पार्टी सूरू असताना मित्रांमध्ये अचानक कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. या वादातून तीन तरूणांनी मिळून दगडाने ठेचून सोमनाथ शिंदे (44) यांची निर्घृण हत्या केली.

Dombivli crime news liquor party dispute three friend killed her

Dombivli crime news liquor party dispute three friend killed her

follow google news

Dombivali Crime News : डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तीन तरूणांनी मिळून मित्राचीच हत्या (Friend Killed) केल्याची घटना घडली आहे. दारू पार्टी करताना किरकोळ कारणावरू या मित्रांमध्ये वाद झाला होता. या वादातूनच तरूणांनी दगडाने ठेचून मित्राची हत्या केली होती. सोमनाथ शिंदे (44) असे मृत इसमाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, तर एकाचा शोध सुरु आहे. या घटनेने डोंबिवलीत (Dombivali) खळबळ माजली आहे. (Dombivli crime news liquor party dispute three friend killed her)

हे वाचलं का?

डोंबिवलीतील तरूणांचा एक ग्रुप दारू पार्टी करायला गेला होता. ही पार्टी सूरू असताना मित्रांमध्ये अचानक कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. या वादातून तीन तरूणांनी मिळून दगडाने ठेचून सोमनाथ शिंदे (44) यांची निर्घृण हत्या केली. तरूणांनी दगडाने सोमनाथ यांच्या डोक्यावर अनेकवेळा करून त्याची हत्या केली. या हत्याकांडानंतर आरोपींनी सोमनाथ शिंदे यांचा मृतदेह डोंबिवली पश्चिम देवीचापाडा खाडीत फेकून दिला होता.

हे ही वाचा : Datta Dalvi : दळवींना अटक, राऊतांचा सुटला संयम; शिंदेंना म्हणाले, चाबकाने…

दरम्यान डोंबिवली पश्चिम देवीचापाडा खाडी किनारी एका पुरूषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती देवीचापाडा येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांना दिली होती. या घटनेची तातडीने दखल घेऊन पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. तसेच मृत तरूणाची ओळख पटवायला सुरूवात केली होती.

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मयताच्या डोक्यात मारहाणीच्या खुणा आढळल्या होत्या.त्यामुळे दगडाने ठेचून त्याची हत्या करण्याचा डाव होता, हे स्पष्ट झाले आहे. यासोबतच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत दोघा आरोपींना डोंबिवलीतील उमेशनगर आणि मोठागाव भागातून अटक केली. योगेश डोंगरे (43, मोठागाव) आणि विलन टावरे (41, उमेशनगर) या दोघांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. तर तिसरा मारेकरी दीपक करकडे (मोठागाव) याचाही पोलिस शोध घेत आहेत.

हे ही वाचा : Pune Crime : समलैंगिक संबंध अन् भररस्त्यात कोयत्याने हत्या; पुण्यात तरूणासोबत काय घडलं?

मृत आणि आरोपी एकमेकांचे परिचित होते. दारू पित असताना त्यांच्यात किरकोळ भांडण झाले. या भांडणातून आरोपींनी सोमनाथ शिंदे याला ठार मारून त्यांचा मृतदेह खाडीत फेकून दिला होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे, तर तिसऱ्या आरोपीचा शोध सूरू आहे.

    follow whatsapp