Crime News: अनेक भोंदुबाबांना तुम्ही अनेकांना चुना लावताना, लोकांना फसवताना बघितला असेल. मात्र उत्तर प्रदेशमध्ये (Uttar pradesh) एक त्याउलट घटना घडली आहे. दोन युवकांनी एका कुंडली बघणाऱ्या ज्योतिषालाच चुना लावला आहे. या दोन तरुणांनी नाराज असणाऱ्या गर्लफ्रेंडला (Girlfriend) खूष करण्यासाठी उपाय काय हे पाहण्यासाठी कुंडली घेऊन ते ज्योतिषाचार्याकडे (Astrologer) गेले होते. मात्र घडले वेगळेच, कारण कुंडली (Kundali) दाखवणे हे फक्त नाटक होते, तो बहाणा करुनच ते दोघं युवक त्या ज्योतिषाचार्याकडे गेले होते, त्यांचे खरे काम हे ज्योतिषाचार्याला लुटणे हेचे होते.
ADVERTISEMENT
ज्योतिषाच्याच भविष्य अंधारात
ज्योतिषाचार्याला लुटण्यासाठी त्या दोघांनी सगळी जय्यत तयारी केली होती. कारण त्यांनी आधी त्या ज्योतिषाला आपल्या जाळ्यात ओढले, त्यानंतर ज्योतिषाला बेशुद्ध करुन त्यांच्या घरातून लाखो रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि किंमती सामान घेऊन हे दोघंही फरार झाले.
हे ही वाचा >> Parul Chaudhary: शिंदे-फडणवीसांनीही कौतुक केलेली पारुल चौधरी आहे तरी कोण?
गर्लफ्रेंड नाराज
ज्योतिषाला लुटण्याची अनोखी घटना घडली आहे ती, उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये. या प्रकरणातील दोघा युवकांनी कुंडली दाखवण्याच्या बहाण्याने त्यांनी एका ज्योतिषाचार्याला लुटून ते फरार झाले आहेत. ज्योतिषाचार्यानी पोलिासंनी सांगितले की, चार दिवसापूर्वी दोन युवक आपल्याकडे आले होते. त्यावेळी त्यांनी आपली गर्लफ्रेंड नाराज असून आम्हाला त्यावर उपाय सांगा. त्यानंतर त्यांना मी 2 ऑक्टोबरला येण्याचा सल्ला दिला होता. मात्र ते दोघंही दोन्ही सोमवारी आले.
संधी साधली
ज्योतिषाचार्यांनी पोलिसांनी सांगताना म्हणाले की, ते दोघं ज्यावेळी घरी आले त्यावेळी घरी मी एकटाच होतो. त्या दोघांनीही आपल्या बोलण्यात त्यांनी मला गुंतवून ठेवले. त्यावेळी त्यांनी काही गोष्टी खाण्यासही दिल्या. त्याच वेळी त्यांनी आपल्या बॅगेतून आणलेल्या कोल्डडिंक्सच्या बॉटलमधील पेय मला प्यायला दिले. ते पिल्यानंतर मात्र मी बेशुद्ध पडलो. त्यानंतर त्या दोघांनी घरामधील लाखो रुपयांची रक्कम, सोन्याचे दागिने, दोन मोबाईल फोन आणि अन्य किंमती सामान लुटले आहे.
हे ही वाचा >> भारताला ‘सुवर्ण’ गिफ्ट! नागपूरच्या ओजस देवतळेने चीनमध्ये मारलं मैदान!
डीव्हीआरच पळविला
ज्योतिषाचार्याच्या घरातील त्यांनी फक्त पैसेच चोरले नाहीत तर त्यांच्या घरातील सीसीटीव्ही आणि त्याचा डीव्हीआरही पळवला आहे. या घटनेनंतर मात्र ज्योतिषाचार्यांनी गोविंदनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT