Hingoli Crime News : हिंगोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका सुनेवर तिच्या दिराने आणि सासऱ्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी दीर आणि सासऱ्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर पीडित सूने पोलीस ठाण्यात जाऊन दीर आणि सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आरोपी दीर आणि सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सूरू आहे. या घटनेने सध्या हिंगोलीत खळबळ माजली आहे.(hingoli crime news father-in-law and husband brother rape daughter-in-law shocking crime story hingoli)
ADVERTISEMENT
हिंगोलीच्या बासंबा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित सुनेचा नवरा हा आजारी होता. त्यात घटनेच्या दिवशी पीडित सून ही घरात एकटीच होते. याचाच फायदा उचलून दीर आणि तिच्या सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सून घरात एकटी असताना सासऱ्याने तिचे उशीने तिचा तोंड दाबले. आणि तुझ्या नवऱ्याला अपघात झाला आहे. तो पॅरालिसीस झाला आहे. तो आता काहीच करू शकत नाही, त्यामुळे आता तू आम्हालाच तूझा पती समज, असे म्हणत सासरा आणि तिच्यी दिराने जबरदस्तीने सूनेवर बलात्कार केल्याची घटना घडली.
हे ही वाचा : Ram Mandir : ठाकरेंचा PM मोदींवर हल्लाबोल, ‘राम अंहकारी नव्हता, पण मंदिराचे उद्घाटन करणारे…’
दरम्यान सुनेने या बलात्काराच्या घटनेची कुठेही वाच्यता करू नये यासाठी सासरा आणि दिराने तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. या धमकीला न जुमानता तिने थेट बासंबा पोलीस ठाणे गाठून सासरा आणि दिराविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिने नवऱ्याची तब्येत बरी नसल्याचे सांगून बलात्कार केल्याचे पोलिसांना सांगितले. सासऱ्याने उशीने तोंड दाबून पतीला पॅरालीसीसी झाल्याचे सांगून बलात्कार केल्याचे पीडित सुनेने म्हटले आहे. सासऱ्यासोबत दिराने सुद्धा तिच्यावर बलात्कार केल्याची तिने तक्रारीत म्हटले आहे.
पीडित सुनेच्या तक्रारीवरून आता सासरा आणि दिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT