Hingoli Crime News : ज्ञानेश्वर पाटील, हिंगोली: अजय देवगण (Ajay Devgan) स्टारर दृश्यम सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल …या सिनेमात अजय देवगण एका तरूणाची हत्या करतो. मात्र या हत्येचा अखेरपर्यंत छडा लावण्यात पोलिसांना यशच येत नाही. हाच दृश्यम पॅटर्न राबवून आतापर्यंत देशभरात अनेक गुन्ह्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना आता महाराष्ट्रातील हिंगोलीत घडली आहे. या घटनेतील आरोपी तरूणाने पाच वेळा दृश्यम पाहून आपल्याच आई-वडिल आणि भावाची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण हिंगोली (hingoli) हादरली आहे. नेमका हा संपूर्ण घटनाक्रम काय आहे? हे जाणून घेऊयात. (hingoli triple murder accused killed her parents and brother shocking crime story)
ADVERTISEMENT
हिंगोलीच्या डिग्रसवाणी शिवारातील एका नालीत 11 जानेवारीला तीन जणांच्या मृतदेहासह एक अपघातग्रस्त दुचाकी सापडली होती. त्यामुळे दुचाकीने प्रवास करताना रस्ते अपघात घडून कुंडलिक जाधव (70), कलावती जाधव (60) आणि आकाश जाधव (27) यांचा मृ्त्य़ू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला होता. त्यानंतर पोलिसांनी हे तीनही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून घटनेच्या सखोल तपासाला सुरूवात केली होती.
हे ही वाचा : Lok Sabha 2024 : भाजपची झोप उडवणारी भविष्यवाणी; थरूरांनी सांगितलं किती जिंकतील जागा?
या घटनेप्रकरणी पोलिसांनी कुंडलिक जाधव यांचा दुसरा मुलगा महेंद्र जाधव याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिली होती. त्यामुळे पोलिसांना महेंद्र जाधववर संशय बळावला आणि त्यांनी घरी जाऊन त्याची चौकशी केली. या चौकशी दरम्यान पोलिसांना घरात रक्ताचा डाग आढळला होता. त्यामुळे पोलिसांचा महेंद्रवर संशय आणखीणच बळावला. यातूनच पोलिसांनी खाक्या दाखवताच महेंद्र जाधवने तिघाच्या हत्येची कबुली दिली.
असा रचला कट
आरोपी महेंद्र जाधवने तिघांची हत्या करण्यासाठी फुलप्रुफ प्लान रचला होता. या प्लॅननुसार त्याने 9 जानेवारीला भाऊ आकाश जाधवला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याला विजेचा शॉक देऊन, डोक्यात हल्ला करून त्याचा जीव घेतला. त्यानंतर त्याच रात्री त्याने आकाशचा मृतदेह घराबाहेर नेऊन नाल्यात फेकून दिला होता. दरम्यान भाऊ आकाशची हत्या केल्यानंतर तो घरी आला आणि झोपी गेला होती.
दुसऱ्या दिवशी 10 जानेवारीला दुपारच्या सुमारास आरोपीने आई कलावतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि तिला शेतात घेऊन गेला. शेतात नेऊन त्याने आईच्या डोक्यावर रॉडने हल्ला करून तिची हत्या केली. या हत्येनंतर तिचा मृतदेह आकाशच्या बाजूला टाकला होता. त्यानंतर मध्यरात्री घरी येऊन वडिलांची हत्या केली. वडिलांना रात्री झोपेच्या गोळ्या दिल्या आणि झोपेतच रॉडने डोक्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली. नंतर वडिलांचा मृतदेह ही आई आणि भावाच्या मृतदेहाच्या ठिकाणी फेकून दिला होता.
हे ही वाचा : Lok Sabha 2024 : “पृथ्वीराज चव्हाण धडधडीत खोटं बोलताहेत “, ‘वंचित’ भडकली
विशेष म्हणजे या घटनेत हत्या झाल्याचे न भासवण्यासाठी आरोपीने अपघाताचाही बनाव रचला होता. आरोपीने त्याच्या दुचाकीची हेडलाईट फोडून घटनास्थळी गाडी सोडून दिली होती. अशाप्रकारे आरोपीने पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी अपघाताचा बनाव रचला होता. मात्र हा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला.
तिघांची हत्या का केली?
महेंद्र जाधवला त्याचे आई-वडील आणि भाऊ पैसे द्यायचे नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात महेंद्रच्या मनात राग होता. याच रागातून त्याने तिघांच्या हत्येचा कट रटला होता. विशेष म्हणजे या तिघांना संपवण्यासाठी त्याने 5 वेळा दृश्यम सिनेमा पाहिला होता. या दरम्यान तो क्राईम पेट्रोलच्या मालिकाही पाहत होत्या. या सिनेमा आणि मालिकेतूनच त्याला हत्येची कल्पना सुचली आणि त्याने घरातील तिघांचा जीव घेतला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी महेद्र जाधवला अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे.
ADVERTISEMENT