पुणे, ठाणेनंतर आता कोल्हापूर…. ISIS प्रकरणात NIAची कारवाई, किती जणांना अटक केली?

मुंबई तक

• 04:55 PM • 14 Aug 2023

इसिस मॉडयुलशी संबंधित आरोपाखाली सध्या अटकसत्र सुरु आहे.नुकतंच दहशतवादाच्या संबंधित आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेने मुख्यमंत्र्याच्या ठाण्यातून शमील साकिब नाचन याला अटक केली होती. या प्रकरणात झालेली ही सहावी अटक होती. या अटकेनंतर आता कोल्हापूरात दहशतवादी संघटनाशी संबंधीत तिघांना अटक करण्यात आली आहे.

isis module national investigation agency three persons arrested from terrorist organization

isis module national investigation agency three persons arrested from terrorist organization

follow google news

इसिस मॉडयुलशी संबंधित आरोपाखाली सध्या अटकसत्र सुरु आहे.नुकतंच दहशतवादाच्या संबंधित आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेने मुख्यमंत्र्याच्या ठाण्यातून शमील साकिब नाचन याला अटक केली होती. या प्रकरणात झालेली ही सहावी अटक होती. या अटकेनंतर आता कोल्हापूरात दहशतवादी संघटनाशी संबंधीत तिघांना अटक करण्यात आली आहे. या तीनही आरोपींकडून कागदपत्र, शस्त्र आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे पुण्यात अटक झालेल्या दहशतवाद्याने कोल्हापूरच्या जंगलात स्फोट,काच्या चाचण्या केल्याची माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तपास करून तिघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. (isis module national investigation agency three persons arrested from terrorist organization)

हे वाचलं का?

इसिस मॉडयुलशी संबंधित कारवायांच सत्र आता पुणे, ठाणे नंतर आता कोल्हापूरपर्यंत पोहोचले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने नुकतीच ठाण्यातून शमील साकिब नाचन या दहशतवाद्याला अटक केली होती.या अटकेनंतर शमील नाचनने चौकशीत कोल्हापूरच्या जंगलात स्फोटकांच्या चाचण्या केल्याची धक्कादायक माहिती दिली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेन कोल्हापूर, इचलकरंजी आणि हुपरी या भागात गेल्या शनिवारी छापा टाकला होता. या छाप्यात 3 संशयीतांना ताब्यात घेतले आहे. या संशयीतांकडून महत्त्वाची कागदपत्रे आढळली आहेत.या संशयीतांचा भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा अजेंडा असल्याचं यातून काही अंशी दिसून आल्याचं समजतंय. मात्र याबाबत जिल्हा पोलीस दलाला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही,अशी माहिती महेंद्र पंडित यांनी दिली आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्रात ऑनर किलिंग! 16 वर्षाच्या लेकीची कोयत्याने हत्या, मृतदेह जाळला; कारण…

दरम्यान या दहशतवादी कारवाईच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिर आणि जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक केल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं.

कोण आहे शमील साकिब नाचन?

शमील (Shamil Nachan) हा साकिब नाचनचा मुलगा आहे आणि तो ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील रहिवासी आहे.साकिब नाचन हा 2002 आणि 2003 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं. तर आता साकिबचा मुलगा शमीलला दहशतवादी कृत्यांसाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (IED)बनवण्याच प्रशिक्षण घेणे आणि चाचणी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

जुल्फीकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसीरूद्दीन काझी आणि अब्दुल कादिर पठाण या आरोपींच्या सहकार्याने शमील साकिब नाचन काम करत होता. यामधील मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी हे सुफा दहशवादी टोळीचे सदस्य आहेत. या दोघांना अद्याप अटक झाली नसून ते फरार आहेत.

    follow whatsapp