Panjab Crime: पंजाबमधील जालंधरमध्ये असलेल्या आदमपूर शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आदमपूरमधील ड्रोली खुर्दम येथे एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्या मृतांमध्ये (Dead Body) मनमोहन सिंग यांचा मुलगा आत्मा सिंह (वय 55), त्यांची पत्नी सरबजीत कौर, त्यांच्या दोन मुली ज्योती (32) आणि गोपी (31), ज्योती यांची मुलगी अमन (3) यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची मिळालेल्या माहितीनुसार मृत मनमोहन सिंह यांचे जावई सरबजीत सिंह यांनी सांगितले की, त्यांनी ज्यावेळी या कुटुंबाला फोन केला होता. त्यावेळी त्यांनी कोणीच फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांनी थेट त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
कुटुंबाची आत्महत्या का?
मनमोहन सिंह हे कोणीच फोन उचलत नसल्यामुळे त्यांनी थेट ड्रोली गावामध्ये येण्याचा निर्णय घेतला. ते ज्यावेळी घरी आले त्यावेळी त्यांना बेडवर पडलेले तीन मृतदेह दिसून आले त्यावेळी त्यांना धक्काच बसला. तर मनमोहन आणि सरबजीत कौर यांचे मृतदेह पंख्याला लटकलेले दिसले. त्यामुळे त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहांची पाहणी करून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेचा तपास करताना घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा >> Anjali Damania : ‘शिंदे-फडणवीसांनी भुजबळांना पैसै देण्यास भाग पाडले’, फर्नांडिसांना का द्यावे लागले साडे आठ कोटी?
मृतांच्या ओठांवर जखमा
मनमोहन सिंह यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, आर्थिक टंचाई असल्यामुळे त्यांनी कर्ज घेतले होते. मात्र त्याची माहिती त्यांच्या घरातील माणसांना नव्हती. त्यामुळे घेतलेल्या कर्जामुळे घरात प्रचंड वाद झाले. त्या कर्जाच्या वादातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पोलिसांनी सांगितले की मृतांच्या प्रत्येकाच्या ओठावर जखमा झाल्या आहेत. तर तीन वर्षाच्या मुलीच्या गालावरही जखमा आढळल्या असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.
हत्या की आत्महत्या
घरातील सर्व सदस्यांचे मृतदेह सापडल्याने अनेकांना धक्का बसला आहे. मात्र प्रत्येकाच्या ओठावर जखम आढळून आल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केल्याचे सांगितले आहे. त्या जखमा कशा झाल्या आणि त्यांनी खरचं आत्महत्या केली आहे की त्यांच्या हत्या करण्यात आली आहे त्याचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT