कल्याण : आमदाराच्या नावाने अकाऊंट, महिलांना म्हणायचा, “हाय, तुम्ही भेटू शकता का?”

मिथिलेश गुप्ता

• 01:54 PM • 09 Jul 2023

कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट काढून महिलांना मेसेज करणाऱ्या एका तरुणाला कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Kalyan crime news, MLA Ganpat Gaikwad

Kalyan crime news, MLA Ganpat Gaikwad

follow google news

Kalyan Crime News : कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट काढून महिलांना मेसेज करणाऱ्या एका तरुणाला कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

हे वाचलं का?

समोर आलेल्या माहितीनुसार हा तरुण महिलांना हाय, हॅलो, तुम्ही भेटू शकता का? असे मेसेज पाठवायचा. काही महिलांनी आमदार गणपत गायकवाड यांना तुम्ही आम्हाला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली आहे का? असे विचारले, त्यानंतर हा प्रकार अजेडात आला. या प्रकरणी आमदार गायकवाड यांनी कोलशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

तो तरुण कोण?

या प्रकरणात कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी फेक आकाऊंट तयार करत महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मेसेज करणाऱ्या चंदन शिर्सेकर या तरुणाला अटक केली. चंदन हा ओला गाडी चालक आहे. चंदन हा कोळसेवाडी परिसरात राहणारा आहे. तो ओला गाडी चालक आहे. चंदन फक्त दहावी शिकला आहे. विशेष म्हणजे तो पकडला जाऊ नये, यासाठी दुसऱ्यांचे वायफाय आणि हॉटस्पॉट चा वापर करीत होता. मात्र, या प्रकरणात सूत्रधाराला लवकरच अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.

वाचा >> Chhagan Bhujbal : “सुप्रियांचं नाव येताच प्रफुल पटेल म्हणाले मी राजीनामा देतो”

काही दिवसापूर्वी कल्याण पूर्व विधानसभेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांच्या आवाजा ऐवजी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज टाकण्यात आला होता. या प्रकरणात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना काही दिवसापूर्वी त्यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार आले आहे. त्याद्वारे महिलांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली जात होती.

गुड मॉर्निंगचे मेसेज अन्…

तरुण महिलांना या अकाऊंटवरून ‘हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, तुम्ही भेटू शकता का?’ असे मेसेज पाठवत होता. मेसेजनंतर काही महिलांनी थेट आमदार गायकवाड यांना ‘तुम्ही मला फेसबुकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली आहे का?’, अशी विचारणा केली. हे ऐकून गायकवाड यांनी धक्काच बसला.

दरम्यान, कुणीतरी त्यांच्या नावाने फेक अकाऊंट काढून हा प्रकार करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी उल्हास जाधव, हरिदास बोचरे यांनी चंदन सुभाष शिर्सेकर या 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

वाचा >> ‘भाजप-शिवसेना युती तुटण्यामागे शरद पवारांची डील’; भुजबळांनी टाकला नवा ‘बॉम्ब’

रविवारी दुपारी चंदनला कल्याण न्यायालयात हजर केले आहे. चंदनने हा प्रकार स्वतः केला की कुणाच्या सांगण्यावरुन केला? असे मेसेज पाठवून काही आर्थिक फायदा घेतला का? या अंगानेही पोलीस तपास करत आहे.

    follow whatsapp