Jejuri Crime : जेजुरीच्या खंडोबा गडाच्या दर्शनानंतर कडेपठारच्या डोंगराला दर्शनासाठी निघालेल्या आजी व नातीबाबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी दुपारी आजी व तिची नात देवदर्शनाला म्हणून कडेपठारवर (Kadepathar) निघाल्या होत्या. त्यावेळी पायवाटेनने जाताना त्यांना एक व्यक्ती भेटला. त्यावेळी त्याने तुम्हाला जवळचा रस्ता दाखवतो म्हणून तो एका वेगळ्या वाटेने घेऊन जाऊ लागला. त्यावेळी त्याने दरीतील जनाई मंदिराजवळ घेऊन गेला. मंदिर दरीत असल्याने आजीबरोबर असलेल्या अल्पवयीन नातीवर त्यांना अत्याचार (Abuse minor girl) करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आजी व नातींनी त्या नराधमाला प्रतिकार करत त्याला नातीने दगड फेकुन मारला. (khandoba temple in jejuri After visiting minor girl Kadepathar temple abuse)
ADVERTISEMENT
दोघींना मानसिक धक्का
अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला दगल लागल्याने तो जखमी झाल्याने तो तिथून पळून गेला. त्यानंतर सोमवारी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे. हा प्रकार घडल्यानंतर त्या दोघींनी परिसरातील नागरिकांना सांगितला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारण यावेळी त्यांना मानसिक धक्का बसला होता.
हे ही वाचा >> Kolhapur Crime: कॅफेमध्ये भलताच खेळ, अश्लील चाळे सुरू असतानाच पोलिसांची एंट्री अन्…
निर्मनुष्य परिसर
आजी व त्यांची नात शुक्रवारी खंडोबाच्या दर्शन करुन त्या कडेकपारीच्या देवाचे दर्शन घेण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांना जवळची वाट दाखवण्यासाठी म्हणून 40-5- वयाचा एक जण भेटला होता. त्यावेळी त्याने तुम्ही माझ्यासोबत चला जवळचा रस्ता दाखवतो असं म्हणत त्यांना आजी आणि नातीला बरोबर येण्यास सांगितले. त्यानंत त्या व्यक्तिबरोबर त्या दोघी कडेकपारीच्या त्या दरीतील मंदिरात पोहचल्या. निर्मनुष्य होत्या. त्या संधीचा फायदा घेऊन अल्पवयीन मुलीची छेडछाड सुरु केली. हा प्रकार आजीच्या लक्षात येताच आजीने त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला.
आजीला मारहाण
त्यावेळी त्या नराधमाने आजीला लाथा बुक्याने मारत आजीला ढकलून दिले. त्यावेळी मुलीने त्याला दगड फेकुन मारला, दगड लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला. तो मनुष्य पळून गेल्यानंतर हा सगळा प्रकार आजी व नातीने तेथील नागरिकांना सांगितला.
हे ही वाचा >> ODI वर्ल्डकप आधीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! ‘या’ अंपायरच्या एन्ट्रीने खळबळ
पोलिसांच्या तपासाला गती
हा सर्व प्रकार त्या कडेकपारीतील दरीत घडल्यामुळे मुलगी आणि आजीही घाबरली होती. या घटनेनंतर त्यांच्या जेजुरीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्या अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.अल्पवयीन मुलीने घडलेला सारा प्रकार पोलिसांना सांगित्यानंतर त्या व्यक्तिने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, त्याचे छायाचित्र काढून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
ADVERTISEMENT