Kolhapur Crime : शहरासह परिसरात अनेक नियमबाह्य घटना घडत असल्यामुळे आता कोल्हापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरातील काही भागात नको त्या घटना घडत असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर कोल्हापूर शहर (Kolhapur City) परिसरातील पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी तपास करुन कारवाई केली होती. याच प्रकारची माहिती टाकळा परिसरातील टोकियो कॅफेत (Tokyo Cafe) महाविद्यालयीन तरुण तरुणीना बसण्यासाठी आणि अश्लील चाळे (obscenities) करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (Superintendent of Police Mahendra Pandit) यांना मिळाली होती.
ADVERTISEMENT
कॅफेत ती व्यवस्था कुणासाठी
कोल्हापुरातील टाकळा परिसरात किरण देवकुळे यांच्या मालकीचं टोकियो कॅफे आहे. या कॅफेमध्ये त्याने महाविद्यालयीन तरुण तरुणींना बसण्यासाठी आणि अश्लील चाळे करण्याची व्यवस्था केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे कॅफे राजरोसपणे सुरू आहे. मात्र या प्रकाराकडे स्थानिक पोलिसांनी कानाडोळा केला होता.
हे ही वाचा >> Crime : धक्कादायक! प्रेयसीच्या मैत्रिणीने घेतला तरूणाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा, कारण…
बेधडक निर्भया पथक
टोकियो कॅफेमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे टोकियो कॅफे टाकळा मेन रोड चौकातील एका बिल्डिंगच्या बेसमेंट मध्ये सुरू होते. या कॅफेची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी आज सकाळीच निर्भया पथकाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्या सुचनेनुसार दुपारी निर्भया पथकाच्या सहाय्यक फौजदार संगिता विटे, हवालदार भाग्यश्री राख, विजया बर्गे, स्मिता जाधव यांनी टोकियो कॅफेवर छापा धाड टाकली. त्यावेळी या कॅफेमध्ये आतील बाजूला खोल्या सदृश्य व्यवस्था करण्यात आली होती. त्या ठिकाणी अश्लील चाळे करतानाच महाविद्यालयीन 14 युवक युवतींना तसंच मालक किरण देवकुळेला निर्भया पथकाने ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा >> Crime : माणुसकीला काळीमा! 1500 रूपयांसाठी अनुसूचित जातीच्या महिलेला नग्न करून मारहाण,चेहऱ्यावर लघवी…
शहरात खळबळ
महाविद्यालयीन युवक युवतींवर कोल्हापूरातील भरवस्तीत एवढी मोठी कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याच प्रकारची कारवाई मागील महिन्यातही करण्यात आली होती. त्यामुळे आता कोल्हापूरातील नेट कॅफे मालकांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT