Crime : आरोपीचं सैतानी कृत्य! अल्पवयीन मुलीला नग्न करून अंगावर फेकलं ॲसिड, नंतर…

मुंबई तक

10 Dec 2023 (अपडेटेड: 10 Dec 2023, 10:53 AM)

अल्पवयीन मुलगी एका घरात घरकाम करत होती, मात्र त्या घरातील कुटुंबानी आणि घरातील एका मुलाने तिचे कपडे फाडून तिला नग्न करायचा प्रयत्न केला. त्यामुळे तिच्या आईने आता थेट पोलिसात तक्रार करून कुटुंबातील सदस्यांवर पोक्सोँतर्गत गुन्हा जाखल करण्यात आला आहे.

minor girl working maid in Haryana was beaten up dog was left on her body acid poured her.

minor girl working maid in Haryana was beaten up dog was left on her body acid poured her.

follow google news

Crime News: दिल्लीजवळ असलेल्या हरियाणातील गुरुग्राममध्ये (Haryana Gurugram) एक धक्कादायक घटना घडली आहे. घरात काम करणाऱ्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तिच्या मालकाने त्यांच्या फक्त कुत्र्याला चावायला सांगितले नाही तर आपल्या कुटुंबासमोर तिचे कपडे फाडून तिला नग्नही केले. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सेक्टर 57 मध्ये ज्या कुटुंबासाठी ती अल्पवयीन मुलगी घरकाम करते. त्या घरातील सदस्यांनी अल्पवयीन मुलीला पहिल्यांदा बेदम मारहाण (brutal beating) केली, त्यानंतर घरात असणाऱ्या कुत्र्याला तिच्या अंगावर सोडले. मुलीला मारहाणच करुन थांबले नाहीत तर कुटुंबातील सगळ्यांसमोर मुलीचे कपडे फाडून तिला नग्न केले.

हे वाचलं का?

नग्न करून मारहाण

मुलीच्या आईने त्या कुटुंबीयांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला आहे. ज्या घरात आमची मुलगी काम करत होती. त्या घरातील महिला तिला लोखंडी रॉडने मारहाण करत होती तर कधी कधी तिने तिला हातोड्यानेही मारहाण केली आहे. तर त्या महिलेच्या दोन्ही मुलांनी अनेकदा तिचे कपडे फाडून तिला नग्न करून व्हिडीओ करत होते. लज्जा उत्पन्न होईल असं तिच्याबरोबर वर्तन करत होते.

हे ही वाचा >>Kalyan: मुलीच्या मित्रांना बोलवायची घरी, पतीने विरोध करताच दिले पेटवून

हातावर ॲसिड ओतलं

मुलीच्या तोंडाला चिकटपट्टी लावून तिला खोलीत कोंडून ठेवले होते. मात्र तिच्या आईने व तिच्या नातेवाईकांच्या मदतीने तिची सुटका केली आहे. जी तक्रार दाखल केली आहे, त्यामध्ये मुलीच्या आईने म्हटले आहे की, माझ्या मुलीला 48 तासांतून फक्त एकदाच जेवण दिले जात होते, व ती ओरडू नये म्हणून तिच्या तोंडाला चिकटपट्टी लावून तिला खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. त्यानंतर घरमालकान तिच्या हातावर ॲसिड ओतून तिला जखमी केले व हे कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

पगार दिलाच नाही

पीडित मुलगी ही बिहारची असून तिला काम सेक्टर 57 मध्ये राहणाऱ्या शशी शर्माच्या घरी मोलकरीन म्हणून कामाला ठेवण्यात आले होते. मुलगीला त्यांच्याच घरात राहिल व महिन्याला 9 हजार रुपये पगार दिला जाईल असं सांगण्यात आले होते. मात्र आता मुलीच्या आईने काम करून घेणाऱ्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. पहिल्या दोन महिन्याचे फक्त त्यांनी आम्हाला पैसे दिल्याचे सांगितले आहे.

पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा

पीडितेच्या आईने सांगितले की, मी अनेकदा माझ्या मुलीला भेटायला गेले होते, मात्र त्या कुटुंबाने मला कधी भेटूच दिले नाही. तिला फोनवरही जास्त वेळ बोलू दिले जात नव्हते. अल्पवयीने मुलीच्या आईने तक्रार केल्यानंतर आता शशी शर्मा आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध मारहाण करून जखमी करणे, महिलांचा अपमान करणे, प्राण्यांना क्रूरपणे हल्ला करायला लावणे व जीवे मारण्याची धमकी देणे हे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आता पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    follow whatsapp