प्रेमाखातर देशाची बॉर्डर ओलांडलेल्या सीमा हैदरची सध्या भारतासह पाकिस्तानमध्ये चर्चा रंगली आहे. मात्र संशयावरून तिची सध्या भारतीय तपास यंत्रणामार्फत चौकशी सुरु आहे. असे असतानाच प्रेमाखातर बॉर्डर क्रॉसकरून आलेली सीमा हैदर एकटी नाही आहे, तर याआधी 11 वर्षापूर्वी म्हणजेच 2012 साली मुंबईचा सॉफ्टवेअर इंजिनीयर प्रेमाखातर पाकिस्तानात लपून-छपून गेला होता. हा तरूण कोण होता? पाकिस्तानने त्याला कशी वागणूक दिली? पाकिस्तानमधून त्याची सुटका कशी झाली? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. (mumbai software engineer hamid ansari went to pakistan from india to meet his girlfried 6 year custody)
ADVERTISEMENT
प्रेमाखातर गाठलं पाकिस्तान
मुंबईचा सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या हामिद नेहाल अंसारीची फेसबूकवर एका पाकिस्तानी तरूणीशी मैत्री झाली होती. पुढे जाऊन ही मैत्री प्रेमात बदलली. त्यानंतर हामिदने आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तानात गाठण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानुसार त्याने योजना बनवायला सुरुवात केली होती. 2011 सालचे हे प्रकरण आहे.
हामीदला पाकिस्तानात अटक
काबुलमध्ये नोकरी मिळाल्याचे कुटुंबियांना सांगत हामिद नेहाल 2012 साली मुंबईवरून अफगाणिस्तानला गेला होता. त्यानंतर लपून छपून तो पाकिस्तानात दाखल झाला होता. पाकिस्तानात हामिदच्या गर्लफ्रेंडने त्याच्या राहण्याची संपू्र्ण व्यवस्था केली होती. मात्र त्याठिकाणी पोहचण्याआधीच भारतीय गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. यावेळी तपासात हामिदला पाकिस्तानात येण्यासाठी गर्लफ्रेंडने खोटे कागदपत्रे पुरविल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात खोटे ओळखपत्र बाळगल्याप्रकरणी हामिदला 3 वर्षाची शिक्षा सुनावली होती.
हे ही वाचा : वासनांध प्रदीप कुरुळकरचे कारनामे! कार्यालयातील बाथरूममध्येच महिलांसोबत…
पाकिस्तानी वकिलांनी केली मदत
हामिदच्या सुटकेसाठी पाकिस्तानच्या ह्युमन राईटचे दोन वकील मदतीसाठी पुढे आले होते. काजी मोहम्मद अनवर आणि ऱख्शंदा नाज या त्या वकिलांची नावे आहेत. वकिलांनी हे प्रकरण हाती घेण्यापुर्वीच ते खुपच गुंतागुंतीचे झाले होते. या दोन्हीही वकिलांनी हामिदच्या कुटुंबियांकडून एकही रूपया न घेता त्याची केस लढली होती. एकीकडे काजी मोहम्मद अनवर कोर्टाला हामिद गुप्तहेर नसल्याचे पटवून देत होते, तर दुसऱीकडे ऱख्शंदा नाज आईप्रमाणे त्याची विचारपुस करत होती. जेलमध्ये भेटायला जाताना त्याच्यासाठी जेवण घेऊन जायची. याचसोबत पाकिस्तानी पत्रकारांनी देखील हामिदच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते.
6 वर्षानंतर जेलमधून सुटका
अखेर तब्बल 6 वर्षानंतर म्हणजेच 18 डिसेंबर 2018 साली हामिदची सुटका करून त्याची भारत वापसी करण्यात आली. पेशावरच्या सेंट्रल जेलमधून सुटल्यानंतर भारतभूमीवर पोहोचता हामीदने जमिनीवर लोळत भारत मॉ ची घोषणा केली होती. भारतात गेल्यावर हामीदने आईजवळ पाकिस्तानात गैरमार्गाने जाण्याची चुक मान्य केली.
2023 मधली दुसरी घटना
प्रेमाखातर इकरा जीवानी नावाची पाकिस्तानी तरूणी फेब्रुवारी 2023 ला भारतात आली होती. पण तिला अटक करून नंतर पाकिस्तानात पाठवले होते. इकराने भारतीय तरूण मुलायम सिंह यादवसोबत लग्न केले होते. ज्यावेळेस तिला पाकिस्तानात पाठवण्यात येत होते, त्यावेळेस तिने पती मुलायस सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तिचे काहीएक ऐकूण न घेता पाकिस्तानात पाठवले होते.
ADVERTISEMENT