‘माझी बायको परत हवी’, हिंदू झालेल्या मुस्लिम तरूणाने कोणाकडे घेतली धाव?

मुंबई तक

• 02:24 PM • 13 Jun 2023

मुंबईत राहणाऱ्या तरूणाने धर्मांतर करून हिंदु धर्म स्विकारला आहे. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2022 रोजी वांद्रेच्या पूर्व विश्वेश्वर मंदिरात दोघांनी लग्न केले होते.तसेच लग्नानंतर महानगरपालिकेत नोंदणी देखील केली होती. त्यानंतर साहिल आणि मेनका एकत्र राहू लागले होते.

muslim man converts to marries girlfriend and now file petition in bombay high court

muslim man converts to marries girlfriend and now file petition in bombay high court

follow google news

मुंबईत आंतरजातीय विवाहाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका मुस्लीम तरूणाचे हिंदू मुलीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून दोघांनी लग्न करण्याचा निर्णय़ घेतला होता. मात्र मुलीच्या कुटुंबियांचा आंतरजातीय विवाह मान्य नव्हता. यामुळे मुस्लीम तरूणाने धर्मांतर करून हिंदू धर्म स्विकारत तरूणीसोबत मंदिरात लग्न केले होते. या लग्नानंतर कुटुंबियांनी पोलिस (Police) ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर तरूणीने पोलीस ठाण्यात मी माझ्या नवऱ्यासोबत राहत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र तरी देखील कुटुंबियांनी आता मुलीला घेऊन राजस्थानमध्ये धाव घेतलीय. या प्रकरणी आता मुलाने मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतलीय.(muslim man converts to marries girlfriend and now file petition in bombay high court)

हे वाचलं का?

मुंबईत राहणाऱ्या साहिल या मुलाने आता मुंबई हायकोर्टात (Bombay High Court)धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेत साहिल म्हणाला की, साहिल चौधऱी म्हणजेच धर्मांतर पुर्वी फैज अंसारी. साहिल आणि 22 वर्षीय मेनका (नाव बदलले) यांची 2017 ला भेट झाली होती. दोघेही एकाच कॉलेजात शिकायचे. या दरम्यान साहिल आणि मेनकामध्ये प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधातून दोघांनी लग्न करण्याचा निर्णय़ घेतला होता. मात्र मेनकाच्या आई-वडिलांना आंतरजातीय विवाह मान्य नव्हता. त्यामुळे साहिलने हिंदू धर्म स्विकारला होता. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2022 रोजी वांद्रेच्या पूर्व विश्वेश्वर मंदिरात दोघांनी लग्न केले होते.तसेच लग्नानंतर महानगरपालिकेत नोंदणी देखील केली होती. त्यानंतर साहिल आणि मेनका एकत्र राहू लागले होते.

हे ही वाचा : Mumbai : दरवाजा उघडला आणि चादरीत सापडला मृतदेह, धारावीत भयंकर हत्याकांड

आई-वडिलाची पोलिसात तक्रार

मेनकाच्या आई-वडिलांनी नया नगर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर साहिल आणि मेनका यांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. यावेळी मेनकाने 23 फेब्रुवारीला ‘मी माझ्या नवऱ्यासोबत राहत आहे. मी कुठेच गायब झाली नाही,” असे लिखित स्वरूपात लिहून दिले होते. मात्र तरी देखील नया नगरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मेनकाला तिच्या कुटुंबियांसोबत 4 दिवस पाठवण्यास भाग पाडले. पोलिसांवर विश्वास ठेवून साहिलने मेनकाला तिच्या वडिलांसोबत जाऊ दिले. यानंतर दोन्ही जोडप्यांची 25 फेब्रुवारीला एकमेकांशी बोलणी झाली होती.यामध्ये मेनकाने, ‘मला यायचे आहे, मला घ्यायला या,. असे तिने म्हटले होते. यानंतर कुटुंबियांनी मेनकाला राजस्थानमध्ये नेल्याची माहिती साहिलला मिळाली होती.

साहिलचे वकील शादाब खोपेकरने न्यायालयात सांगितले की, मेनकाच्या आई-वडिल तिचे दुसऱ्यांदा लग्न करण्याचा प्रयत्न करतायत. या याचिकेनंतर नया नगर पोलिसांना 20 जूनला मेनकाला कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. तर तिकडे राजस्थानहून मेनकाच्या वकिलांनी साहिलला कोर्टाची नोटील बजावली आहे. तसेच या दोघांचे लग्न रद्द करण्यासाठी महापालिकेला नोटीस पाठवली आहे.दरम्यान आता या प्रकरणात न्यायालय साहिल आणि मेनका यांच्या लग्नाला मान्यता देऊन त्यांना एकत्र राहण्यास मंजूरी देते की दोघांचे लग्न रद्द ठऱवून मुलीला आई-वडिलांकडे सोपवते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या प्रकरणी आता 20 जुनला निर्णय होणार आहे.

    follow whatsapp