Nashik Murder : सुखी संसाराची क्षणात झाली राखरांगोळी, आधी संपवलं पत्नीला नंतर…

मुंबई तक

13 Sep 2023 (अपडेटेड: 13 Sep 2023, 03:07 PM)

Nashik Murder : नाशिकमध्ये पतीने निघृणपणे पत्नीची हत्या केल्याने शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीची हत्या करुन पतीने स्वतःही आत्महत्या केल्याने या हत्येचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. कुटुंबीयांना मात्र मोठा मानसिक धक्का बसला आहे.

nashik adgaon murder case husband attack wife head and suicide crime

nashik adgaon murder case husband attack wife head and suicide crime

follow google news

Nashik Murder : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासर परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील जेलरोड परिसरात अनैतिक संबंधातून पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना घडली होती. ती घटना घडून काही दिवस उलटत असतानाच आडगाव (Nashik Adgaon) परिसरातही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात मुसळी घालून तिची हत्या (Wife murder) करुन पतीनेही गळफास लावून  घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला असला आहे.

हे वाचलं का?

अजूनही कारण अस्पष्ट

नाशिक शहरासर परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेलेल असतानाच पत्नीची हत्या करुन स्वतः पतीनेही आत्महत्या केल्याने अनेक धक्का बसला आहे. पत्नीची हत्या का करण्यात आली आहे त्याचा तपास पोलीस करत असले तरी पत्नीची हत्या नेमकी का करण्यात आली आहे त्याचे कारण अजून समजू शकले नाही.

हे ही वाचा >> Rape Case: सासर्‍याचा सुनेवर बलात्कार, त्यानंतर पतीने… हादरवून टाकणारी घटना

आधी पत्नीला संपवलं नंतर…

नाशिक शहरातील आडगाव परिसरात इच्छामणीनगरमध्ये पहाटे झोपेत असताना पती विशाल निवृत्ती घोरपडेने पत्नी प्रीती विशाल घोरपडेच्या डोक्यात मुसळी घालून निघृणपणे हत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. पत्नीची हत्या करुन पतीने स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली असल्याने या घटनेमुळे अनेक जणांना धक्का बसला आहे. मात्र या घटनेचे नेमके कारण अजून समजू शकले नाही.

हे ही वाचा >> Sangli News : पोहत पोहत मगरीजवळ गेला, अन् लोकांच्या काळजाचा ठोका चुकला

का संपवली जीवनयात्रा

नाशिकमधील आडगाव परिसरात इच्छामणीनगरमध्ये घोरपडे कुटुंबीय राहत होते. मात्र एका रात्रीत असं काय घडले हे आता विशाल घोरपडेच्याही कुटुंबीयांना सांगता आले नाही. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर मात्र अनेकांना धक्का बसला आहे. प्रीतीच्या डोक्यात मुसळी घातल्याने डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर विशालनेही गळफास घेऊन आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली आहे.

    follow whatsapp