MP Crime: आपल्या काकीच्या प्रेमात वेडा झालेल्या एका पुतण्याने (Nephew) काकी (Aunty) दुसऱ्याबरोबर बोलते म्हणून 10 वर्षाने लहान असलेल्या पुतण्याने काकीचा गळा चिरला (Throat slit) आहे. जखमी झालेल्या काकीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काकीचा गळा चिरून पुतण्या फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये घडली आहे.बहोदापूर पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, 39 वर्षीय लक्ष्मी शाक्यचे तिचा पुतणा प्रवीण शाक्य (29 वर्षे) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. काकी आणि पुतण्याच्या या प्रेमप्रकरणाची कोणालाच कल्पना नव्हती. गुरूवारी काकी आणि पुतण्या ही दोघंही दुचाकीवरून बाहेर गेली होती.
ADVERTISEMENT
शेजाऱ्याने वाचवला जीव
पुतण्याने आपल्या काकीला एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी घेऊन गेला होता. प्रवीण हा मध्य प्रदेशमधील नगरमध्येच राहत असल्याने तो आणि त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या घरी काकी आणि तो बोलत बसला होता. ही दोघं बोलत असतानाच काकूचा जोरजोरात ओरडल्याचा आवाज आला. काकी जोरजोरात ओरडू लागताच त्यांच्या ओळखीची व्यक्ती धावत त्यांच्याकडे गेली. त्यावेळी काकीच्या मानेवर वार केल्याने मानेतून रक्तस्राव होत होता तर प्रवीणच्या हातात चाकू होता. त्यानंतर काकीला प्रवीणच्या तावडीतून सोडवून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे ही वाचा >> Eknath Shinde : फडणवीसांनंतर शिंदेंचा अजित पवारांना सल्ला, मलिकांबद्दल काय बोलले?
पुतण्या झाला फरार
काकीचा गळा चिरल्यानंतर ती गंभीर जखमी झाल्याचे त्याच्या लक्षात येताच प्रवीण फरार झाला आहे. त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर काकीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या काकीवर उपचार चालू असून फरार प्रवीणचा पोलीस शोध घेत आहेत.
फोनवर पडलं महागात
प्रवीण आणि लक्ष्मी यांच्यामध्ये कोणत्या तरी तिसऱ्याच व्यक्तीवरून त्यांच्यामध्ये वाद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सांगितले की, काकी आणि पुतण्याचे प्रेमसंबंध चालू असतानाच काकी तिसऱ्याच व्यक्तीबरोबर बोलत होती. ही गोष्टच प्रवीणला खटकली होती. त्यामुळेच त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले होते. काकी तिसऱ्या व्यक्तीबरोबर का बोलत म्हणूनच त्याने काकीच्या मानेवर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले आहे.
ADVERTISEMENT