Pune Porche Accident news : ओंकार वाबळे : पुणे अपघात प्रकरणात आता सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांनी महाबळेश्वरमध्ये उभारलेल्या अनधिकृत हॉटेलवर बुलडोझर चालवून कारवाई केली आहे. आरोपींनी सरकारची फसवणूक करून अनधिकृत हॉटेल बांधले होते.या हॉटेलवर आता पाडकामाची कारवाई करण्यात आली आहे. (pune porche accident news vishal agarwal family five star hotel on government land mahablewshwar demolish)
ADVERTISEMENT
साताऱ्यातील प्रसिद्ध हिल स्टेशन असलेल्या महाबळेश्वर येथे पारसी जिमखाना 10 एकरांवर पसरलेला आहे. राज्य सरकारने या जिमखान्याची जमीन पारशी ट्रस्टच्या नावे 30 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिली होती.या करारानंतर 19 जूनला 2016 ला अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल पारशी ट्र्स्टच्या समितीवर आले. सुरेंद्र अग्रवाल समितीवर येताच एका मागून एक कुटुंबातीस सदस्यांची नावे ट्रस्टवर येऊ लागली.
सुरेंद्र अग्रवाल पारशी ट्र्स्टवर आल्यावर उषा अग्रवाल यांचेही नाव जोडले गेले. नंतर विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, श्रे विशाल अग्रवाल आणि अभिषेक गुप्ता यांची 2 मार्च 2020 रोजी पारसी ट्रस्टचे समिती सदस्य म्हणून नाव देण्यात आले होती. या नावांमुळे ट्रस्टवरील पारशी नावे संपुष्टात आली होती.
हे ही वाचा :मुंबईकरांनो, काम असेल तरच बाहेर पडा! IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा
खरं तर ही 10 एकर जमीन राज्य सरकारने पारशी ट्रस्टला निवासी वापरासाठी दिली होती. मात्र अग्रवाल यांनी जिमखान्याचे रिसॉर्टमध्ये रूपांतर केले. तसेच हेरिटेज संरचना सुशोभित केली आणि अतिरिक्त कॉटेज बांधले. त्यानंतर काही वर्षांसाठी त्यांनी हॉटेल इंडस्ट्री ब्रँड, Regenta ला एक रिसॉर्ट भाड्याने दिला होता.
दरम्यान ही मालमत्ता MPG म्हणजेच महाबळेश्वरमधील महाबळेश्वर पारसी जिमखाना म्हणून ओळखली जाते. या मालमत्तेवर अनधिकृपणे रिसॉर्ट बांधून शासनाची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जिल्हा प्रशासनाने संबंधित रिसॉर्टवर शासनाची फसवणूक आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.
पारसी जिमखाना मार्फत रहिवासी परवानगी असतानाही रिसॉर्ट उभारून अनधिकृतपणे स्थानिक हेरिटेज वास्तुलाही सुशोभित करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित रिसॉर्ट आज बुलडोझर चालवून कारवाई करण्यात आली.
ADVERTISEMENT