Pune Porsche Accident : 'त्या' मुलाच्या आजोबाचे छोटा राजनशी कनेक्शन? अंडरवर्ल्ड डॉनची...

मुंबई तक

22 May 2024 (अपडेटेड: 22 May 2024, 01:16 PM)

Pune Accident : पुण्यात शनिवारी मध्यरात्री 17 वर्षीय मुलाने दारूच्या नशेत दोन दुचाकीस्वार इंजिनीअर तरूण आणि तरूणीला पोर्शे कारने चिरडले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात नवीन अपडेट मिळाली आहे. अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं आहे

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन आरोपीच्या आजोबाचे छोटा राजनशी कनेक्शन?

point

प्रॉपर्टीच्या वादात सुरेंद्रने घेतली छोटा राजनची मदत?

point

छोटा राजन आणि अग्रवाल यांच्यावर खटला सुरू

Pune Drunk and Drive Case : सध्या पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात रिअल इस्टेट व्यावसायिक अग्रवाल कुटुंब जोरदार चर्चेत आहे. आता या प्रकरणात एक नाव ट्वीस्ट समोर आला आहे. अग्रवाल कुटुंबीयांसाठी कायद्याला न जुमाननं काही नवीन नाही, असं या नव्या अपडेटमधून दिसत आहे. कारण अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आता समोर आलं आहे. (pune porsche accident new update Underworld connection of agarwal family of minor accused with chota rajan

हे वाचलं का?

माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी आपल्या भावासोबत संपत्तीच्या वादात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची मदत घेतली होती. छोटा राजनच्या गुंडांनी गोळीबारही केला होता. या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा एफआयआरही दाखल करण्यात आला. आधी पोलिसांनी तपास केला नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

हेही वाचा : Nilesh Lanke : ईव्हीएम स्ट्राँगरुमपर्यंत गेला अन्...; लंकेनी व्हिडीओच दाखवला

पुण्यात शनिवारी (18 मे) मध्यरात्री 17 वर्षीय मुलाने दारूच्या नशेत दोन दुचाकीस्वार इंजिनीअर तरूण आणि तरूणीला पोर्शे कारने चिरडले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. अनिष अवधिया (24 वर्षे) आणि अश्विनी कोष्टा (24 वर्षे) अशी मृतांची नावं आहेत. दोघंही मध्य प्रदेशातील रहिवासी असून पुण्यात ते कामाला होते. या प्रकरणात बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला काही अटींसह 15 तासांच्या आत जामीन मंजूर केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली.

अल्पवयीन आरोपीच्या आजोबाचे छोटा राजनशी कनेक्शन?

विशाल अग्रवाल पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक आहे. विशालचे वडील आणि अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल याचं छोटा राजनशी कनेक्शन असल्याचं समोर आलं. सुरेंद्र कुमार अग्रवालने राजनशी हातमिळवणी करत प्रॉपर्टीवरून झालेल्या वादात भाऊ आरके अग्रवाल याला मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. 

हेही वाचा : 'शिंदे साहेब, गजानन कीर्तिकरांची त्वरित हकालपट्टी करा', शिवसेना नेता संतापला

बंड गार्डन पोलीस ठाण्यात सुरेंद्र याच्याविरुद्ध अजय भोसले नावाच्या व्यक्तीचा, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपानुसार, सुरेंद्रने सुपारी देऊन काही गुंडांना पाठवलं होतं, ज्यांनी आरके अग्रवाल यांचा मित्र अजय भोसले यांच्यावर गोळी झाडली होती. या घटनेत भोसले यांचा चालकही जखमी झाला होता. हे प्रकरण मुंबईच्या सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.

प्रॉपर्टीच्या वादात सुरेंद्रने घेतली छोटा राजनची मदत?

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल याच्यावर सध्या मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. त्याचा भाऊ आरके अग्रवाल यांच्यासोबत प्रॉपर्टीवरून वाद झाल्याची माहिती आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सुरेंद्रने छोटा राजनशी हातमिळवणी केली होती. इतकंच नाही तर यासंदर्भात सुरेंद्र कुमार अग्रवाल याने बँकॉकला जाऊन छोटा राजनचा गुंड विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ ​​विजय तांबट याची भेट घेतल्याचाही आरोप आहे.

छोटा राजन आणि अग्रवाल यांच्यावर खटला सुरू

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवरील सर्व खटले सीबीआयने एकत्र करून तपास केले आहेत. सर्व खटल्यांच्या सुनावणीसाठी मुंबईत विशेष ट्रायल कोर्ट नेमण्यात आले आहे. पुण्यातील या प्रकरणातही एसके अग्रवाल, राजन आणि इतरांविरुद्ध 2021 पासून खटला सुरू आहे.

हेही वाचा : 600 कोटींची संपत्ती, लक्झरी हॉटेल्सचा मालक..., कोण आहे बिल्डर विशाल अग्रवाल?

पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह...

यापूर्वी या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडे होता. नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला. गुन्हेगारी कट रचणे, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर कलमांखाली सुरेंद्र कुमार अग्रवालवर गुन्हा दाखल करण्यात आला. शस्त्रास्त्र कायद्याची काही कलमेही लावण्यात आली आहेत. तसंच, छोटा राजन आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई कधीच केली नाही, यावरूनही पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. 

या प्रकरणी न्यायालयात सुरू आहे सुनावणी

एसके अग्रवाल यालाही आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटक करण्यात आली नव्हती, असे तपासकर्त्यांचे म्हणणे आहे. भारतीय दंड संहितेच्या सामान्य कलमांतर्गत या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणाची माहिती असलेल्या काही वरिष्ठ तपासनीसांचा आरोप आहे की, पुणे पोलिसांनी या प्रकरणात जाणीवपूर्वक गंभीर चुका केल्या आहेत. सध्या एसके अग्रवाल या खटल्यात जामिनावर आहे, तो 6 मे रोजी सुनावणीला हजर होता. या सुनावणीत काही महत्त्वाच्या साक्षीदारांचीही साक्ष सुरू आहे.

    follow whatsapp