Pune Accident: दोन डॉक्टर निलंबित, डीनला सक्तीची रजा... पुणे अपघात प्रकरणात धडाधड कारवाई!

रोहिणी ठोंबरे

30 May 2024 (अपडेटेड: 30 May 2024, 10:28 AM)

Porsche Car Accident : पुण्यातील पोर्शे कार अपघातात मोठी कारवाई करत महाराष्ट्र सरकारने रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड करणाऱ्या दोन्ही डॉक्टरांना निलंबित केले आहे. याशिवाय डीन डॉ.विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

बारामतीच्या डीनकडे रूग्णालयाची जबाबदारी

point

सुषमा अंधारेंनी व्यक्त केली सुरक्षेबाबत चिंता

point

जेजे बोर्डाचीही होणार कसून चौकशी ?

पुणे : Pune Porsche Car New Update : पुण्यातील पोर्शे कार अपघातात मोठी कारवाई करत महाराष्ट्र सरकारने रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड करणाऱ्या दोन्ही डॉक्टरांना निलंबित केले आहे. आरोपी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी या दोन डॉक्टरांनी रक्ताच्या नमुन्यात हेराफेरी केली होती. या खुलाशानंतर दोघांना अटक करण्यात आली. याशिवाय बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून सिव्हिल हॉस्पिटलचे डीन डॉ.विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, त्यांचा अतिरिक्त कार्यभार डॉ.चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. (pune porsche car accident dmer sends sassoon hospital dean on compulsory leave)

हे वाचलं का?

ससून रुग्णालयाचे डीन डॉ. विनायक काळे यांनी रजेवर जाण्यापूर्वी सांगितले की, 'डॉ. अजय तावरे यांना अटक केल्यानंतर तत्काळ निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवला होता, तर अस्थायी रूपात कार्यरत असलेले डॉ. श्रीहरी हळनोर यांची सेवा 28 मे रोजी संपवण्यात आली.' ते म्हणाले, "निलंबनाची कारवाई राज्य सरकारच्या पातळीवर केली जाते. आम्ही आमच्या बाजूने प्रस्ताव पाठवला होता. कारवाईही झाली आहे."

हेही वाचा : महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभेचा एक्झिट पोल किती अचूक ठरला?

डीन म्हणाले होते, "अटकेनंतर आम्ही डॉ. अजय तावरे यांच्याकडून फॉरेन्सिक मेडिसिनच्या एचओडीचा पदभार घेतला आणि तो विभागातील वरिष्ठ प्राध्यापकांना दिला. डॉ. श्रीहरी हळनोर यांची सेवा तात्पुरती होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेला तिसरा आरोपी अतुल घाटकांबळे हा स्वच्छता कर्मचारी असून त्याने आरोपीचे रक्ताचे नमुने डस्टबिनमध्ये फेकले होते.'

बारामतीच्या डीनकडे रूग्णालयाची जबाबदारी

महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या शिफारशीवरून फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ.अजय तावडे आणि ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. 

हेही वाचा : Maharashtra Lok Sabha : महायुतीच्या 20 जागा धोक्यात, 'या' चुका भोवणार?

या आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या तीन सदस्यीय समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. समितीच्या अहवालाच्या आधारे वैद्यकीय शिक्षण विभागाने या दोन अधिकाऱ्यांना (डॉक्टर) निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. डॉ.चंद्रकांत म्हस्के हे बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आहेत. आता त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. 

सुषमा अंधारेंनी व्यक्त केली सुरक्षेबाबत चिंता

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी (29 मे) डॉ. अजय तावरेच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली. 'डॉ. अजय तावरे पोर्श अपघात प्रकरणातील प्रमुख साक्षीदार आहे, त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. पोर्श कार प्रकरण, आरोग्य खात्याबाबत निकालानंतर खुलासे करेन. डॉ. अजय तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी वाटते." अशी सुषमा अंधारेंनी शंका व्यक्त केली. 

"अजय तावरे, श्रीहरी हळनोरची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे असं वाटतं. आर्यन ड्रग्स प्रकरणातील प्रभाकर साहिलचा संशयास्पद मृत्यू झाला.ललित पाटील प्रकरणात पुढची चौकशी काय झाली?" असे सवाल सुषमा अंधारेंनी यावेळी उपस्थित केले. "माझ्याकडे भरपूर नावं, मी कोणाला सोडणार नाही असं तावरे म्हणाले. पुरावे नष्ट करण्यासाठी तावरेच्या जिवाला धोका का होणार नाही? 2 डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे." असंही त्या यावेळी बोलल्या.        

हेही वाचा : नवनीत राणांची निकालाआधीच वाढली चिंता; अमरावतीबद्दल मोठी अपडेट

जेजे बोर्डाचीही होणार कसून चौकशी ?

महाराष्ट्र सरकारने पुणे कार अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळ (जेजेबी) सदस्यांच्या वर्तनाची आणि या प्रकरणात आदेश जारी करताना नियमांचे पूर्णपणे पालन केले होते की नाही याची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, राज्य महिला आणि बाल विकास विभागाने (WCD) गेल्या आठवड्यात पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. 
 

    follow whatsapp