Porsche Accident : "गुन्हा गंभीर, पण आरोपीचे...", बिल्डरच्या मुलाला हायकोर्टाने का दिला जामीन?

विद्या

25 Jun 2024 (अपडेटेड: 25 Jun 2024, 07:36 PM)

Pune Accident: पुणे पोर्शे कार अपघात (Pune Porsche Car Accident) प्रकरणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने आज (25 जून) जामीन मंजूर केला आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

बिल्डरच्या मुलाला हायकोर्टाने का दिला जामीन?

point

पुणे पोर्श अपघातात नेमकं काय घडलं होतं? 

Pune Porsche Car Accident Case : पुणे पोर्शे कार अपघात (Pune Porsche Car Accident) प्रकरणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने आज (25 जून) जामीन मंजूर केला आहे. तसेच त्याला तातडीने बालसुधारगृहातून सोडण्याचे आदेश दिले. 'गुन्हा कितीही गंभीर असो, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या इतर कोणत्याही आरोपीशी जसा व्यवहार करतो, तसाच व्यवहार आम्हाला या मुलासोबत करावा लागेल,' असे न्यायालयाने म्हटले आहे. (pune porsche car accident new update Why did the High Court grant bail to the builder vishal agarwal son)

हे वाचलं का?

अल्पवयीन आरोपीच्या आत्याने मुंबई न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत अल्पवयीन आरोपीला बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवल्याचा आरोप केला होता. यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला होता पण, निर्णय रोखून ठेवला होता. मात्र आज या प्रकरणी न्यायालयाकडून निकाल देण्यात आला आहे.  

हेही वाचा : मविआला रोखण्यासाठी महायुतीची स्ट्रॅटजी! विधानसभेसाठी अशी मत'पेरणी'?

बिल्डरच्या मुलाला हायकोर्टाने का दिला जामीन?

अल्पवयीन आरोपीच्या आत्याने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. गेल्या आठवड्यात आरोपीच्या आत्याने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं की, 'मुलाला बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याला त्वरित सोडण्यात यावे. लोकांचा रोष आणि राजकीय अजेंडामुळे पोलीस तपासाच्या योग्य मार्गावरून भटकत आहेत. त्यामुळे बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकले नाही.' 

या याचिकेवर 21 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. निकाल देण्यासाठी आजची तारीख दिली होती.

हेही वाचा : MVA : मविआचा जागावाटपासाठी 'हा' फॉर्म्युला?; ठाकरे-पवारांच्या पक्षाला किती जागा?

 
पण शेवटी त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भात न्यायालयाने महत्त्वाचा मुद्दा नोंदवला आहे.  तो म्हणजे, पहिल्यांदा जामीन दिल्यानंतर पुन्हा ताब्यात घेणे बेकायदेशीर असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी म्हटले आहे. सध्या अल्पवयीन आरोपीचे आई-वडील तुरुंगात आहेत. त्यामुळे त्याचा ताबा आता त्याच्या आत्याकडे देण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पुणे पोर्श अपघातात नेमकं काय घडलं होतं? 

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात 18 मे च्या मध्यरात्री आणि 19 मे रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली. बड्या बिल्डरच्या मुलाने भरधाव वेगात गाडी चालवत दोन जणांना चिरडले होते. यामध्ये तरूण आणि तरूणीचा मृत्यू झाला होता. घटनेच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत होता. या अपघातानंतर तिथे उपस्थित असलेल्या स्थानिकांनी अल्पवयीन आरोपीस पकडून मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. पुणे पोलिसांवरही या प्रकरणी अतिशय गंभीर आरोप झाले होते.

हेही वाचा : T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानने रचला इतिहास, ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर

पुढे या प्रकरणाचा जसजसा तपास होत गेला, तेव्हा नवनवीन खुलासे होत गेले. धक्कादायक माहिती पोलीसांच्या हाती लागत गेली. अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले पण अखेर त्याला आज जामीन मंजूर झाला आहे.

    follow whatsapp