Seema Haidar Sachin meena Love Story : प्रेमाखातर पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर (Seema Haidar) आणि सचिन मीनाची (Sachin meena) भारतीय तपास यंत्रणाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.ज्यामध्ये सीमा हैदरचे पाकिस्तानी सैन्याशी असलेले कनेक्शन आणि ओळखपत्रातील वयाचा घोळ या सर्व गोष्टी खूपच संशयास्पद होत्या. त्यात आता सीमा आणि सचिनने काठमांडूच्या (Kathmandu) हॉ़टेलमध्ये एक संपूर्ण आठवडा काढला होता. या हॉटेलमध्ये असताना त्यांनी नेमके काय-काय केले? याची संपूर्ण कहानी समोर आली आहे. (seema haider sachin meena stayed in kathamandu hotel singel bedroom rs 500 rent seven night inside story)
ADVERTISEMENT
नेपालची राजधानी असलेल्या काठमांडू येथील न्यू विनायक हॉटेलमध्ये सीमा हैदर आणि सचिन मीनाची भेट झाली होती. या हॉटेलमध्ये दोघांनी 204 नंबरचा रूम बुक केला होता. हा रूम बुक करताना दोघांनी हॉटेल मालकाला खोटी नावे सांगितली होती. दोघेही साधारण आठवडाभर या हॉटेलमध्ये राहिले होते. या हॉटेलचे एक दिवसाचे भाडे 500 रूपये होते.
हे ही वाचा : Seema Haider: पाकिस्तानी सैन्याशी खास कनेक्शन, ATSच्या तपासात सीमा हैदरबाबत धक्कादायक उलगडा
लग्नाची रील बनवली…
सीमा आणि सचिनने हॉटेलमध्ये असताना अनेक व्हिडिओ बनवले आहेत. यामध्ये त्यांच्या लग्नाचा देखील व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ त्यांनी हॉटेलच्या रूममध्ये शुट केला होता. काठमांडूमध्ये असताना सीमाने कोणालाच ती पाकिस्तानी असल्याचे देखील सांगितले नव्हते. हॉटेल रिसेप्शनिस्ट गणेश रोकामगरने सांगितले की, दोघेही हॉटेलच्या एकाच खोलीत राहायचे. या दरम्यान त्यांनी खोलीत अनेक रील व्हिडिओ बनवले होते. तसेच सीमा आणि सचिन बाहेर फिरायला देखील जायचे. सीमाला नाईट क्लबमध्ये देखील जायचे होते, मात्र सचिनने तिला भारतात फसवणूक होत असल्याचे सांगितल्यावर तिने प्लान रद्द केला होता.
नेपालमध्ये आयडीविना मिळतात रूम
हॉटेल रिसेप्शनिस्ट गणेश रोकामगरने आज तकला सांगितले की, या परीसरात असलेले सर्वच हॉटेल ग्राहकांचे आयडी घेत नाही. फक्त नाव आणि माहिती घेऊन त्यांची नोंद ठेवली जाते. यावेळी हॉटेलचे रजिस्टर चेक केले असता सचिन आणि मीनाचे नाव सापडले नव्हते. विशेष म्हणजे गणेशने या दोघांचे बुकींग केले होते.
दरम्यान यूपी एटीएसने 17-18 जुलै रोजी सीमा हैदरची तब्बल 18 तास चौकशी केली होती. यानंतर एटीएसने सांगितले की, सीमाची कहानी (PubG Love Story) देखील खरी असू शकते. मात्र, सीमाला अद्याप क्लीन चिट देण्यात आलेली नसून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT