Indore news : पती आपल्या प्रमोशनसाठी पत्नीच्या शरीराचा व्यापार करू शकतो का? इंदूरमध्ये अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एक पुरुष आपल्या पत्नीला बॉस आणि मित्रांसोबत सेक्स करण्यास (sex relation) भाग पाडत होता. त्याला प्रमोशन (Office promotion) मिळावे आणि जास्तीत जास्त पैसे मिळावा म्हणून तो असं करायचा. पत्नीने नकार दिल्यास तिला मारहाण देखील करायचा. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. शेवटी, इंदूरचे वाइफ स्वॅपिंग म्हणजे काय आहे जाणून घेऊया. (indore wife swiping case)
ADVERTISEMENT
सेक्स टॉक, स्कॅम.. सेक्सटॉर्शनचा भयंकर जाळ
इंदूर जिल्हा न्यायालयात खटला सुरू आहे
इंदूरच्या जिल्हा न्यायालयात पीडितेने याचिका दाखल करून पतीसह इतर लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेचा दावा आहे की तिचा पती पत्नीची अदलाबदली करायचा. स्वत:च्या प्रमोशनच्या आणि जास्त पैसे कमावण्याच्या लालसेपोटी तो असं करायचा. पतीवर मित्र आणि इतर लोकांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायला पत्नीला भाग पाडायचा, असा आरोप आहे. याप्रकरणी महिलेने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर न्यायालयाने महिलेच्या पतीसह अन्य लोकांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Satara Crime News : घराबाहेर झोपलेल्या तरुणाला अज्ञाताकडून गळा चिरुन खून
पॉर्न चित्रपटांसारखे कृत्य करण्यास भाग पाडायचा
पीडित महिला इंदूरच्या नंदा नगर येथील रहिवासी आहे. पीडित महिलेचे वकील कृष्ण कुमार कुनहारे यांनी सांगितले की, पीडितेचे लग्न पुण्यातील रहिवासी अनंत छाबरा (नाव बदलले आहे) याच्याशी झाले आहे. आरोपी पती अनंतची चुकीच्या लोकांशी मैत्री होती. अनंत पीडितेला त्याचा बॉस आणि मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडतो. परदेशी घाणेरड्या चित्रपटांमध्ये ज्या प्रकारे लैंगिक संबंध दाखवले जातात तसेही करायला लावायचा. असे करून त्याला स्वतःची प्रमोशन हवी असायची. पीडितेचे म्हणणे आहे की, तिचा दीरही तिच्यासोबत अवैध संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मध्यरात्री तो पीडितेला वाईट हेतूने स्पर्श करायचा आणि संबंध ठेवण्यासाठी तिचा लैंगिक छळ करायचा.
याला विरोध केल्यावर महिलेला मारहाण करण्यात आली. पीडितेला 12 वर्षांची मुलगीही आहे. त्यामुळे सुरुवातीला तिने या प्रकरणाला फारसे महत्त्व दिले नाही. पण आता ती मजबुरीने कोर्टात आली आहे. अशा प्रकारांना कंटाळून पीडितेने एकदा हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी देखील माहिती सांगण्यात आली.
पीडित महिला 12 ऑगस्ट 2022 रोजी तिच्या माहेरी गेली. पीडितेच्या वतीने प्रथम पोलिसात तक्रार करण्यात आली. मग पतीने माफी मागितली. त्यानंतर पुन्हा अत्याचार सुरू केले. त्यानंतर आता पीडितेने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. इंदूर येथील जिल्हा न्यायालयात घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करताना पती आणि त्याच्या कुटुंबीयांच्या अत्याचारापासून संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.त्यावर न्यायालयाने महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून तपास अहवाल मागवला. महिला व बालविकास विभागानेही पीडितेसोबत अत्याचार झाले असल्याचे मान्य केले आहे.
ADVERTISEMENT